Maharashtra Breaking News LIVE: हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर आता राज्याच्या मंत्रिमंडळातील घडामोडी इथपासून अनेकही कैक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचच लक्ष असणार आहे. काय आहेत त्या सर्व बातम्या... पाहा एका क्लिकवर Live
23 Dec 2024, 07:29 वाजता
एस टी तोट्यात; दररोज सुमारे तीन ते साडेतीन कोटींचा तोटा
एसटी महामंडळ संकटात सापडले असून एस टी ला दररोज सुमारे तीन ते साडेतीन कोटींचा तोटा होत आहे. यामुळे एसटी संकटात सापडली आहे. या संकटातून एसटीला बाहेर काढण्यासाठी निधीची प्रतीक्षा आहे. नुकत्याच पार पडलेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एसटीच्या प्रश्नाबाबत चर्चा झाली नसल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात कुठल्याही पक्षाच्या सदस्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत याबाबत प्रश्न उपस्थित केला नसल्याचे बरगे म्हणाले.
23 Dec 2024, 07:13 वाजता
मुंबईतील वडाळा येथे कारखाली चिरडून 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईतील वडाळामध्ये कारखाली चिरडून 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. वडाळ्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज इथली ही दुर्घटना आहे. कार मागे घेत असताना आयुष लक्ष्मण किनवाडे याला गाडीची धडक बसली. यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कार चालकाला अटक करण्यात आली.
हेसुद्धा वाचा : भीषण! पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडलं; तिघांचा मृत्यू
23 Dec 2024, 07:10 वाजता
कॅग अहवालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कॅग अहवालावर प्रतिक्रिया दिलीय. कोरोना काळात औषधांमध्ये झालेला घोटाळा ही गंभीर बाब असल्याचं फडणवीस म्हणालेत. तर या अहवालाचा अभ्यास करून त्यावर प्रतिक्रिया देणार असल्याचंही फडणवीस म्हणाले.
23 Dec 2024, 06:49 वाजता
राज्यसभेवर जाण्याची ऑफर; छगन भुजबळ यांची तीव्र नाराजी
राज्यसभेवर जाण्याची ऑफर देण्यावरुन छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आधी लोकसभा निवडणूक लढायला सांगितलं. नंतर राज्यात तुमची गरज असल्याचं सांगत लोकसभेचं तिकीट नाकारलंत. आता पुन्हा राज्यसभेवर जायला सांगितलं अशा शब्दांत भुजबळांनी आपली नाराजी व्यक्त केली.
23 Dec 2024, 06:48 वाजता
आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसींचा पुन्हा एल्गार
जरांगेंचं उपोषण सुरु होताच ओबीसी रस्त्यावर उतरणार. ओबीसींच्या आरक्षणासाठी आंदोलन करणार. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची माहिती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 25 जानेवारीपासून मनोज जरांगे उपोषण करणार. तर जरांगेंचं उपोषण सुरु होताच ओबीसींचं आंदोलन सुरु होणार. प्रकाश शेंडगे यांची माहिती.
23 Dec 2024, 06:47 वाजता
मंत्री उदय सामंत आज बीड, परभणी दौ-यावर
मंत्री उदय सामंत आज बीड, परभणी दौ-यावर. मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबीयांची घेणार भेट. परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची घेणार भेट, उदय सामंत दोन्ही कुटुंबीयांचं सांत्वन करणार
23 Dec 2024, 06:46 वाजता
राहुल गांधी आज परभणीत...
सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी देशाचे विरोधीपक्ष नेते राहुल राहुल गांधी परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 1 वाजता नांदेड विमानतळ येथे राहुल गांधी यांच होणार आहेत,दुपारी 2:15 वाजता ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत, आंबेडकरी चळवळीचे परभणीचे नेते विजय वाकोडे यांच ह्रदय विकाराने निधन झालं होतं, दुपारी 3 वाजता वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट राहुल गांधी घेणार आहेत, त्यानंतर परभणी वरून नांदेड विमानतळाकडे राहुल गांधी निघणार आहेत.