Maharashtra Breaking News LIVE: मानखुर्दमध्ये गोदामाला मोठी आग,अग्निशामक दल घटनास्थळी रवाना

Maharashtra Breaking News LIVE: आजचा दिवस कोणत्या घडामोडी वेधणार लक्ष, कोणता नेता ठरणार चर्चेचा विषय? सामान्यांच्या जीवनावर कोणत्या निर्णयांचे होणार थेट परिणाम... पाहा सर्व बातम्या एका क्लिकवर...   

Maharashtra Breaking News LIVE: मानखुर्दमध्ये गोदामाला मोठी आग,अग्निशामक दल घटनास्थळी रवाना

Maharashtra Breaking News LIVE: हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर आता राज्याच्या मंत्रिमंडळातील घडामोडी इथपासून अनेकही कैक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचच लक्ष असणार आहे. काय आहेत त्या सर्व बातम्या... पाहा एका क्लिकवर Live 

23 Dec 2024, 11:38 वाजता

छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद

विधानभेच्या निकालामध्ये ओबीसीचा देखील वाटा
ओबीसीच्या पाठबळामुळे प्रंचड विजय झाला
ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी घेणार 
8 दिवसांनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार 

 

23 Dec 2024, 11:13 वाजता

भुजबळ- फडणवीस भेटीमागचं कारण काय?

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना भेटणं हे स्वाभावीक आहे. तसेच छगन भुजबळ हे राज्याचे ज्येष्ठ नेते ते आपल्या मतदार संघाचे मुद्दे घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात अशी माहिती अतुल भातखळकर - आमदार भाजप यांनी दिली. 

23 Dec 2024, 11:10 वाजता

छगन भुजबळ-फडणवीसांची भेट

सागर बंगल्यावर छगन भुजबळ आणि मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्धा तास भेट झाली. मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळ नाराज असल्याच सांगण्यात येत आहे. 

23 Dec 2024, 11:03 वाजता

राज-उद्धव ठाकरेंबाबत संजय राऊतांचं सूचक विधान 

दोन्ही ठाकरेंवर महाराष्ट्राचं प्रेम - संजय राऊत 
दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास आनंद होतो 

23 Dec 2024, 09:50 वाजता

हिंगोलीत कार चालकाने एका व्यक्तीला चिरडलं

हिंगोलीच्या वसमत शहराची मुख्य बाजार पेठ असलेल्या झेंडा चौकात काल मध्यरात्री एका कार चालकाने एका व्यक्तीला चिरडल्याची घटना घडली आहे, कार वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, या अपघात रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या इतर दोन ते तीन मोटार सायकलीला ही या कार ने उडवलं असून यामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत,यापैकी एक जण गंभीर जखमी आहे, कार थेट फुलाच्या दुकानात शिरल्याने तेथे पूल व्यावसायिकाचे ही नुकसान झाले आहे,हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झालाय, घटनेचा तपास वसमत शहर पोलिस करीत आहेत. 

 

23 Dec 2024, 09:49 वाजता

शहापूरात समृध्दी महामार्ग धुक्यात हरवला..! शंभर मीटवरचे वाहन दिसेना..

शहापूर ग्रामीण पट्ट्यात सोमवारी पहाटे दाट धुक्याची चादर पसरलेली पहायला मिळाली. येथील समृध्दी महामार्गावर धुक्याची चादर दिसून येत आहे. शंभर मिटर पर्यंतचे वाहन देखील दिसून येत नाही, यामुळे वाहन चालक आपली वाहन‌ दिवे लावून सावकाश चालवत असल्याचे चित्र पाहायला मिळतेयं, इतक्या दाट प्रमाणात धुकं पडलंय. अचानक उद्भवलेल्या धुक्यामुळे परतीच्या पावसाने संकेत दिल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. पहाटे चार-साडेचार वाजल्यापासून वातावरणात धुक्याची दाट चादर तयार झालीय.

23 Dec 2024, 08:34 वाजता

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तूर्तास नाही

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तूर्तास नाही. कर्तव्यपथावरील प्रतिष्ठेच्या संचलनासाठी यंदा 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले आहेत. यामध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, चंडीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि हरियाणा या यादीत महाराष्ट्राला तूर्तास स्थान मिळालेले नाही. राजधानी दिल्लीच्या चित्ररथालाही परवानगी नाकारण्यात आल्याचे असं समजून येते. 

23 Dec 2024, 08:26 वाजता

मंत्र्यांचं खातेवाटप झालं; आता पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यांचं खातेवाटप झालंय.. त्यानंतर लगेचच पालकमंत्रिपदावरून दावे प्रतिदावे करण्यात येतायेत.. यामध्ये शिवसेनेच्या आमदारांनी आघाडी घेतल्याचं दिसतंय.. संजय शिरसाट यांनी मंत्री झाल्यानंतर लगेचच संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदावर दावा केलाय.. राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहे तर दुसरीकडे भरत गोगावले यांनीही पालकमंत्रीपदावर दावा केलाय..तर दुसरीकडे मंत्रालयातील दालनावरूनही मंत्र्यांमध्ये रुसवे-फुगवे असल्याचं दिसतंय.. 

 

23 Dec 2024, 08:14 वाजता

आरोग्य उपकेंद्र धुळखात पडून

धुळे जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे अजंग गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे गेल्या पाच वर्षापासून धुळखात पडून आहे. आरोग्य विभागाच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सर्दी, खोकला, ताप अशा आजारांसाठी नागरिकांना तब्बल 12 ते 15 किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. मात्र गेल्या पाच वर्षापासून तयार असलेल्या या उपकेंद्राचे उद्घाटन करून ते सुरू करण्याचे औदार्य प्रशासनाने दाखवलेला नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी देखील याबाबत कमालीचे उदासीन आहेत. हे उपकेंद्र सुरू करण्यात यावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलेले आहे. उपकेंद्र सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा हे नागरिकांनी दिलेला आहे. आरोग्य विभाग आता तरी जागा होईल का? हाच खरा प्रश्न आहे

 

23 Dec 2024, 08:06 वाजता

चालत्या कारने घेतला पेट; कारच्या स्फोटात चालकाचा होरपळून मृत्यू

सांगलीच्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील बोरगाव टोलनाका येथे चालत्या सीएनजी कारने पेट घेतल्याने स्फोट होऊन चालकाचा जळून मृत्यू झाला आहे. गणेश माळवदे,वय 27 असे या चालकाचे नाव आहे.कवठेमहांकाळकडून मिरजेकडे जात असताना बोरगाव टोल नाका येथे सीएनजी कार असणाऱ्या गाडीने अचानक पेट घेतला,त्यानंतर काही क्षणातच पेटलेल्या गाडीत स्फोट होऊन गाडीच्या आत अडकलेल्या चालकाचा होरपळून मृत्यू झाला. आग लागल्यानंतर गाडीचे चारही दरवाजे लॉक झाली, त्यामुळे चालक गणेश याला बाहेर पडता आलं नाही,त्यामुळे गाडीसह तो आगीत जळुन मृत्यूमुखी पडला आहे.