Maharashtra Breaking News LIVE: हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर आता राज्याच्या मंत्रिमंडळातील घडामोडी इथपासून अनेकही कैक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचच लक्ष असणार आहे. काय आहेत त्या सर्व बातम्या... पाहा एका क्लिकवर Live
23 Dec 2024, 21:45 वाजता
जलसंपदा विभागात लवकरच मेगा भरती होणार
जलसंपदा विभागात लवकरच मेगा भरती होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मंत्री होताच गिरीष महाजन यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळ या विभागाची आढावा बैठक जळगाव येथे घेतली. या बैठकीत प्रकल्पाचेया कोणत्या अडचणी आहेत या समजून घेतल्या आणि सर्व प्रकल्प युद्ध पातळीवर पूर्ण करण्यासाठी सुचना दिल्या.
23 Dec 2024, 20:47 वाजता
क्रिकेटर विनोद कांबळी उपचारासाठी कोपरच्या आकृती रुग्णालयात!
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे उपचारासाठी भिवंडी तालुक्यातील कोपर येथील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेतं. विनोद कांबळे यांच्या तब्येत अचानक बिघडल्याने दवा उपचारासाठी ते आकृती रुग्णालयात शनिवारी दाखल झाले आहेत. डाॅक्टरांनी युरेन इन्फेक्शन, कावीळ व पायाला दुखापत तसेच शरीरात अशक्तपणा व पायांना वात येणे या कारणास्तव ते रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डाॅक्टांनी सांगितले आहे.
23 Dec 2024, 19:52 वाजता
सतीश वाघ हत्या प्रकरणातील फरार आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंबमधुन मुख्य आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सतीश वाघ प्रकरणात एकून 5 आरोपी अटकेत आहेत.
23 Dec 2024, 18:11 वाजता
शेख हसीना यांना परत करा, बांगलादेशचे भारताला पत्र
बांगलादेशने भारताला पत्र लिहून माजी पंतप्रधान शेख हसीना यांना परत करण्याची मागणी केली आहे.मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशातील अंतरिम सरकारने भारत सरकारला पत्र लिहिले आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारमध्ये शेख हसीना यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. बांग्लादेशमध्ये ऑगस्टच्या अखेरीस सत्तापालट झाल्यानंतर शेख हसीना भारतात आल्या होत्या. या पत्रात बांगलादेशने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना परत करण्याची मागणी केली आहे.
23 Dec 2024, 17:15 वाजता
महायुतीच्या मंत्र्यांना दालनांचे वाटप
महायुतीच्या मंत्र्यांना दालनांचे वाटप करण्यात आले आहे. यात मंगलप्रभात लोढा, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटील, अतुल सावे,शंभूराज देसाई, नितेश राणे, आशिष शेलारांना मुख्य इमारतीत दालन देण्यात आले आहे. तर बावनकुळे, विखे,मुश्रीफ,गिरीश महाजन, रावळ, गोगावलेंची दालने विस्तारित इमारतीत असतील. दालनांचे वाटप झाल्याने मंत्र्यांना पदभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झालाय.
23 Dec 2024, 16:18 वाजता
'महाराष्ट्राला 13 लाख 29 हजार 678 पक्क्या घरांची भेट'
पंतप्रधान आवास योजेनेंतर्गत महाराष्ट्रात 13 लाख 29 हजार 678 घरे बांधली जाणार आहेत. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यासंदर्भात घोषणा केली. पुण्यात आयोजित किसान सन्मान दिवस कार्यक्रमात ते बोलत होते.
23 Dec 2024, 13:41 वाजता
छगन भुजबळ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते-आदिती तटकरे
'भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा ही केवळ अफवा'
आदिती तटकरे यांची माहिती
भुजबळ-फडणवीस यांच्या भेटीचा अर्थ वेगळा काढू नये-आदिती
23 Dec 2024, 13:05 वाजता
मलिदा लाटण्यासाठी पालकमंत्रिपद हवंय
खासदार संजय राऊतांचा सवाल
पालकमंत्रिपद मिळालं की प्रश्न सुटणार?
23 Dec 2024, 12:45 वाजता
अजित पवार यांची पत्रकार परिषद
पुण्यातील समस्यांची माहिती घेतली आहे, अशी माहिती अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच शहरात 100 बेडचं काम सुरु असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना छगन भुजबळ यांच्याबद्दल विचारलं असता
भुजबळांचा प्रश्न पक्षांतर्गत असल्याचं उत्तर अजित पवारांनी दिली.
23 Dec 2024, 12:02 वाजता
राहुल गांधी आज परभणीत असणार
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीला आज राहुल गांधी जाणार आहेत.
राहुल गांधी आज सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन करणार
सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे