Loksabha Election 2024 Live Updates: 'तुम्ही आत्मा सैतानाला विकलात', उद्धव ठाकरेंची पीएम मोदींवर टीका

Loksabha Election 2024 Live Updates: आजचा शुक्रवार हा सभांचा ठरणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्व अपडेट्स जाणून घ्या या एका लिंकवर...

Loksabha Election 2024 Live Updates:  'तुम्ही आत्मा सैतानाला विकलात', उद्धव ठाकरेंची पीएम मोदींवर टीका

Loksabha Election 2024 Live Updates: आजचा शुक्रवार हा महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सभांचा शुक्रवार ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेणार आहेत. राजकीय क्षेत्रातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...

10 May 2024, 20:34 वाजता

तुम्ही माझ्या शिवसेनेला नकली शिववसेना म्हणाले मला बाळासाहेबनची नकली संतान म्हणता, मोदी तुम्ही तुमचा आत्मा शैताना ला विकला, बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल विचार करा, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पीए मोदी यांच्यावर केलीय. 2014 साली तुम्ही युती तोडली, 2019 मध्ये सेना प्रमुखांच्या खोलीत अमित शाह ने ठरवले होते आई वडील तुळजाभवानी शपथ घेऊन बोललो आहे, मी म्हटलं होते सेने चा मुख्यमंत्री बनवून दाखवेल तुम्ही शब्द तोडला.

10 May 2024, 18:59 वाजता

 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 50 दिवसांनंतर तुरुंगामधून बाहेर आले आहेत. कोर्टाकडून केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. निवडणूक प्रचारासाठी 22 दिवसांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल आपल्या कुटुंबासह घराकडे रवाना झाले. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सुप्रीम कोर्टात (Supreme Court) अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 

10 May 2024, 18:36 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates:

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघांचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे उद्या मैदानात. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या वरळी बीडीडी येथे अरविंद सावंत यांचा प्रचार, प्रचार रॅली दरम्यान आदित्य ठाकरे राहणार उपस्थित. तर भायखळा येथे ठाकरे गटाकडून उद्या मशाल रॅलीचे आयोजन 

10 May 2024, 16:40 वाजता

उद्धव ठाकरेंची जालन्यातील तर शरद पवारांची पुण्यातील सभा रद्द

अवकाळी पवासामुळे उद्धव ठाकरेंची आजची जालन्यातील सभा रद्द झाली आहे. उद्धव ठाकरेंनी जालना दौरा रद्द केला आहे. तर दुसरीकडे शरद पवारांची पुण्यातील वडगावशेरीमधील सभाही पावसामुळे रद्द झाली आहे.

10 May 2024, 15:24 वाजता

वातावरण तापलं! गुजरातसंदर्भात विधानावरुन राऊतांच्या अटकेची मागणी

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीसंदर्भात नगरमधील जाहीर सभेत केलेल्या विधानावरुन त्यांच्याविरुद्ध नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल पत्रकारांशी चर्चा करताना संजय राऊत यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं सांगत आपण कोणीचीही तुलाना औरंगजेबाशी केलेली नाही असं स्पष्ट केलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त...

10 May 2024, 15:23 वाजता

मला खासदार बनवायला महायुती सक्षम साळवींनी चिंता करू नये : किरण सामंत

मला खासदार करायचे की नाही याचा निर्णय महायुती घेईल. मला खासदार बनवायला शिंदे, फडणवीस सक्षम आहेत. राजन साळवींनी माझी काळजी करण्यापेक्षा आपल्या आमदारकीची चिंता करावी असे वक्तव्य शिवसेनेचे किरण सामंत यांनी केले आहे.

10 May 2024, 14:20 वाजता

केजरीवाल यांना जामीन मंजूर; 50 दिवसांनंतर तुरुंगाबाहेर, प्रचार करणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 50 दिवसांनंतर तुरुंगामधून बाहेर येणार आहेत. कोर्टाने केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. निवडणूक प्रचारासाठी 22 दिवसांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त..

 

10 May 2024, 13:28 वाजता

हातकणंगलेमध्ये बॅनर वॉर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शाहूवाडीमध्ये बॅनर वॉर रंगलं आहे. सत्यजित पाटील सरूडकर यांच्यानंतर आता धैर्यशील माने यांची खासदार निवडीचे बॅनर लागले आहेत.  हातकणंगलेमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये आहे जोरदार चुरस आहे. मतदानाच्या काही तासातच दोन्ही उमेदवारांच्या विजयाचे बॅनर झळकले.

10 May 2024, 13:24 वाजता

'उद्धव ठाकरेंवर नाही पवारांवर आरोप करा; फडणवीसांना दिलेली ऑफर'

ईडीची कारवाई झाली त्यावेळी फडणवीसांनी समझौता करण्यासाठी एक माणूस पाठवला होता. एक शपथपत्र द्या. तुम्हाला ईडीकडून त्रास होणार नाही, असं फडणवीसांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला आहे. तुम्ही जर शपथपत्र करून दिलं तर तुमच्यावर ईडी नाही, सीबीआय नाही, त्यावेळेस अनिल देशमुखांना सांगितलं होतं मी तुमच्यासोबत जिंदगीभर समझोता करणार नाही. त्या शपथपत्रामध्ये उद्धव ठाकरेंवर नव्हे शरद पवारांवर आरोप करा अशा पद्धतीच प्रतिज्ञापत्र मला करायला लावलं होतं, असा खळबळजनक दावा आंबेजोगाई येथील बजरंग सोनवणे यांच्या निवडणूक प्रचार सभेमध्ये अनिल देशमुख यांनी केला.

10 May 2024, 10:31 वाजता

मुंबईत कारवाईचा धडाका

मुंबईत आगामी लोकसभा निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी मुंबई पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. मुंबईत 107, सीआरपीसीअंतर्गत सर्वाधिक म्हणजे 6201 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तर 110 सी.आर.पी.सी कायद्यांतर्गत 2154 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव मुंबई पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. या आरोपींकडून लेखी करारपत्र घेत त्यांना योग्य ती समजही देण्यात आली आहे.