Gajlakshmi And Panch Divya Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होताना दिसतात. यावेळी मानवी जीवनावर त्याचा परिणाम होतो. ज्योतिष्य शास्त्रानुसार, 500 वर्षांनंतर एकाच वेळी 5 राजयोग तयार झाले आहेत. ज्यामध्ये व्यापार दाता बुध आणि ग्रहांचा राजा सूर्य वृषभ राशीत असल्यामुळे बुधादित्य राजयोग तयार झाला आहे. त्याचबरोबर कर्माचा दाता शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत असल्यामुळे शश महापुरुष राजयोग तयार झाला आहे. शुक्राचा वृषभ राशीत प्रवेश झाल्यामुळे मालव्य राजयोग तयार झाला आहे.
त्याचप्रमाणे बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. शिवाय वृषभ राशीत शुक्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होतोय. असे 5 राजयोग तयार होत असल्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या काळात काही राशींच्या व्यक्तींना अचानक लाभ होतो.
पाच राजयोग तयार झाल्याने मेष राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. लोकांच्या सुख-सुविधांमध्येही वाढ होणार आहे. तुम्हाला व्यवसायात या काळात उत्तम यश मिळेल. तुम्हाला तुमच्या कामात प्रसिद्धी मिळेल. तसंच तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे. नोकरदार लोकांसाठी पदोन्नती आणि वेतनवाढीची शक्यता आहे.
पाच राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुमची लोकप्रियता वाढू शकणार आहे. या काळात तुम्हाला नवीन आणि उत्कृष्ट संधी मिळण्याची अपेक्षा आहे. यावेळी नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. तुमच्या जोडीदाराचीही प्रगती होऊ शकते. तसेच यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. जे नोकरी शोधत आहेत त्यांना नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.
वृषभ राशीच्या लोकांसाठी पाच राजयोगांची निर्मिती शुभ ठरू शकणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन नोकरीसाठी उत्कृष्ट ऑफर मिळू शकतात. या कालावधीत तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकण्याची शक्यता आहे. तुमच्या आवडीच्या कोणत्याही ठिकाणी ट्रान्सफर मिळवू शकता. या काळात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकतं.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )