अकोल्यात संतप्त महिलांकडून देशी दारुच्या दुकानाची तोडफोड

अकोल्यातील रेणुकानगर परिसरातील एका देशी दारुच्या दुकानाची संतप्त महिलांनी पहाटे तोडफोड केलीय. 

Updated: Jun 17, 2017, 11:33 AM IST
अकोल्यात संतप्त महिलांकडून देशी दारुच्या दुकानाची तोडफोड title=

अकोला : अकोल्यातील रेणुकानगर परिसरातील एका देशी दारुच्या दुकानाची संतप्त महिलांनी पहाटे तोडफोड केलीय. 

महामार्गापासून 500 मीटरच्या आतील दारु दुकानं हलविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानंतर अनेकांनी आपली दुकानं हलविण्यास सुरुवात केलीय. 

मात्र, अकोल्यतील बोरगावमंजू येथील महिला संघर्ष समितीने या दुकानांना विरोध केलाय. जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांना निवेदन देऊऩही दारु दुकानांना परवानगी दिल्याने संतप्त महिलांनी दुकानाची तोडफोड केली.