पुण्यात ध्वनीप्रदूषण : मानाच्या गणपती मंडळांसह ३५ मंडळांना नोटीस

गेल्या वर्षीच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांसह ३५ मंडळांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. 

Updated: Jun 17, 2017, 11:21 AM IST
पुण्यात ध्वनीप्रदूषण : मानाच्या गणपती मंडळांसह ३५ मंडळांना नोटीस title=
छाया सौजन्य : DNA

पुणे : गेल्या वर्षीच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांसह ३५ मंडळांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. 

पोलिसांनी नोंदवलेल्या निरक्षणानुसार या मंडळांसमोरिल वाद्यांचा आवाज ९० ते १०५ डेसिबल पर्यंत गेल्याचं समोर आलय..आणि त्याबाबतचा अहवाल संबंधित पोलीस ठाण्यांकडून प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, यंदाचा गणेशोत्सव तोंडावर असताना गेल्या वर्षीच्या मिरवणुकीसंदर्भात नोटीसा बजावण्यात आल्याने मंडळांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.