फी नाही भरली म्हणून पालकांना कायदेशीर नोटीस; कोव्हिडसह शाळांची मुजोरी वाढली

कोरोना काळात खासगी शाळांची मुजोरी पालकांनी आणखी किती सहन करावी? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. 

Updated: Apr 9, 2021, 01:49 PM IST
फी नाही भरली म्हणून पालकांना कायदेशीर नोटीस; कोव्हिडसह शाळांची मुजोरी वाढली title=

 नाशिक : राज्यात कोरोनामुळे  गेल्यावर्षीपासून शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.  विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण आणि थोड्याफार प्रमाणात गृहपाठ असे शिक्षण सुरू आहे. त्यातच पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सरसकट परीक्षा न देता पास करण्यात येणार आहे.त्यातच खासगी शाळांची मुजोरी वाढली आहे. पालकांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू आहेत.

 राज्यातील कोरोनापरिस्थितीमुळे आधीच लोकांना आर्थिक ताण सहन करावा लागतोय. त्यातच फी नाही भरली म्हणून नाशिकच्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेने पालकांना नोटीसा पाठवल्याची घटना समोर आली आहे. कोरोना काळात खासगी शाळांची मुजोरी पालकांनी आणखी किती सहन करावी? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. 
 
 नाशिक शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधील काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी कोव्हिड काळातील आर्थिक तंगीमुळे फी भरलेली नाही. म्हणून शाळेने पंधरा दिवसात फी न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच कोर्ट कामकाजासाठीचा खर्चसुद्धा पालकांना भरावा लागणार अशा नोटीसा पालकांना पाठवल्या आहेत. या नोटीसा उच्च न्यायालयातील वकीलाकडून पाठवण्यात आल्या आहेत.
 
 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुजोर शाळा आणि शिक्षण संस्थांवर सरकारचा काही वचक आहे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्य पालकांकडून विचारण्यात येत आहे.