MPSC परीक्षा पुढे ढकलणार ? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महत्वाचा निर्णय घेणार 

Updated: Apr 9, 2021, 01:31 PM IST
MPSC परीक्षा पुढे ढकलणार ? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक title=

मुंबई : राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता MPSC परीक्षा पुढे ढकला अशी मागणी सर्व स्तरातून होतेय. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महत्वाचा निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री,अधिकारी यांच्याबरोबर व्हीसी मार्फत बैठक होत आहे. 

कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना 11 एप्रिल रोजी होणार परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. त्या पार्शवभूमीवर ही बैठक असेल.

दरम्यान ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. 11 एप्रिल रोजी एमपीएससीची परीक्षा आहे. मात्र अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भात 'झी 24 तास'ला माहिती दिली.

गेले काही दिवस MPSC परीक्षेच्या मुद्द्यावर राज्यातील वातावरण तापले होते. यावरुन राज्य सरकारवर टीका केली जात होती.  MPSC ची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे राज्य सरकारने म्हटलंय. योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन होऊन परीक्षा पार पाडली जाणार असल्याचे सांगण्यात आले.