Video Viral : गौतमी पाटीलनं चालू कार्यक्रमातच...; स्टेजवर प्रेक्षकांचा घोळका

Guatami Patil Viral Video : लावणी कलाकार गौतमी पाटीलचं (Guatami Patil) नाव आता किमान महाराष्ट्रासाठी तरी नवं नाही. अर्थात तिच्या नावाची असणारी ओळख प्रत्येकासाठी वेगळी आहे. 

Updated: Dec 16, 2022, 10:35 AM IST
Video Viral : गौतमी पाटीलनं चालू कार्यक्रमातच...; स्टेजवर प्रेक्षकांचा घोळका title=
Lavani artist Gautami patil Dance Program huge crowd on stage in beed maharashtra video viral marathi news

Guatami Patil Viral Video : लावणी कलाकार गौतमी पाटीलचं (Guatami Patil) नाव आता किमान महाराष्ट्रासाठी तरी नवं नाही. अर्थात तिच्या नावाची असणारी ओळख प्रत्येकासाठी वेगळी आहे. कोणासाठी ती सोशल मीडियावर व्हिडीओतून व्हायरल होणारी मुलगी आहे, कोणासाठी लावणी कलाकार, तर कोणासाठी एक अशी मुलगी, जिच्या फॉलोअर्सचा आकडा थक्क करुन जातो. 

लावणी आणि त्याभोवती फिरणाऱ्या असंख्य कारणांमुळं चर्चेत असणारी गौतमी काही दिवसांपूर्वीच तिच्या एका कार्यक्रमादरम्यान, परफॉर्मन्स सुरु असताना केलेल्या अश्लील हावभावांमुळे अडचणीत सापडली होती. आरोप प्रत्यारोप, पत्रकार परिषद आणि स्पष्टीकरणांनंतर कुठे हा वाद निवळला. पण, गौतमीच्या नावाची चर्चा मात्र दुपटीनं वाढली. अशी ही लावणी कलाकार पुन्हा अशाच एका कारणानं नजरा वळवत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे बीडमध्ये नुकताच पार पडलेला तिचा एक कार्यक्रम. 

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ (Gautami patil dance video)

बीडमध्ये एका हॉटेलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या लावणी डान्सचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गर्दी होणं अपेक्षित होतं, पण गर्दी झाल्यानं एकाएकी कार्यक्रमस्थळी गोंधळ झाला. परळी रोडवरील कार्यक्रमादरम्यान हा गोंधळ झाल्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. हा सर्व प्रकार पाहता गौतमी पाटीलने चालू कार्यक्रमात डान्स थांबवला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये गौतमी दिसत नसून, स्टेजवर फक्त प्रेक्षकांचाच घोळका दिसत आहे. 

हेसुद्धा वाचा : Gautami Patil: "पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेल मग...", मेघा घाडगेंची गौतमी पाटीलवर सडकून टीका!

कोण आहे गौतमी पाटील? (Who is Gautami patil)

लावणी, त्यामध्ये केले जाणारे अश्लील हावभाव आणि त्यामुळं होणारे वाद, चर्चा यामुळं गेल्या काही दिवसांपासून सतत नजरा वळवणारी गौतमी मुळची कोल्हापूरची. गेल्या 4-5 वर्षांपासून ती लावणी नृत्यामध्ये सक्रीय असल्याचं कळतं. पण, सोशल मीडियावर तिची हवा पाहता अनेकजण थक्क होतात.