पोलिसाने रामदास आठवलेंवर त्यांच्यासमोरच केली कविता

केंद्रीय मंत्री रामदास आठवले जिथे जिथे जातात, तिथे कविता करतात.

Updated: May 12, 2019, 08:38 PM IST
पोलिसाने रामदास आठवलेंवर त्यांच्यासमोरच केली कविता  title=

लातूर : केंद्रीय मंत्री रामदास आठवले जिथे जिथे जातात, तिथे कविता करतात. सध्या रामदास आठवले लातूर दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनाच एक कवि भेटला. हा कवी होता चक्क एक पोलीस. पोलीस नाईक दिलीप लोभे यांनीच आठवलेंवर केलेली कविता सादर केली.

दुष्काळ दौऱ्याची पाहणी करण्यासाठी रामदास आठवले हे लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील जय नगर येथे आले होते. यावेळी त्यांच्या बंदोबस्तासाठी असलेले औसा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक दिलीप लोभे यांनी आठवले यांच्यावर केलेली कविता त्यांच्यापुढेच वाचून दाखविण्याची इच्छा जाहीर केली. ती स्वतः रामदास आठवले यांनी मान्य केली. त्यानंतर पोलीस नाईक दिलीप लोभे यांनी वर्दीत ती कविता सर्वांपुढे ऐकवली. स्वतः रामदास आठवले यांनीही ती उभी राहून सर्वांसोबत ऐकली.