लासलगाव जळीतकांडातील महिलेचा मृत्यू

महिलेला १५ फेब्रुवारीलाला अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं

Updated: Feb 22, 2020, 07:43 AM IST
लासलगाव जळीतकांडातील महिलेचा मृत्यू  title=

नाशिक : नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावमधल्या जळीतकांडातील महिलेचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमाराला उपचारादरम्यान मुंबईतल्या मसिना रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. सहा दिवस तिने मृत्यूशी झुंज दिली. मध्यरात्री शवविच्छेदन करुन, पहाटे तिचा मृतदेह मुंबईहून तिच्या गावी रवाना करण्यात आला. 

लासलगाव जवळ पिंपळगाव भागात राहणाऱ्या या महिलेला १५ फेब्रुवारीलाला एसटी स्थानकावर अंगावर पेट्रोल टाकून जाळलं होतं. त्यात ती ६७ टक्के भाजली होती. तिच्यावर सर्वात आधी लासलगावमधल्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून, नंतर तिला पुढल्या उपचारांसाठी नाशिकला हलविण्यात आलं होतं. तिथून तिला मुंबईतल्या मसिना बर्न स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 

या प्रकरणी मुख्य आरोपी रामेश्वर भागवत याला पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचं रामेश्वर भागवतनं सांगितलं आहे. या प्रकरणात आरोपी रामेश्वर भागवत, पेट्रोल पंप व्यवस्थापक आणि पंप कर्मचारी आकाश शइंदे या तिघांवर गुन्हे दाखल आहेत.