कोपर्डीतील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी- अमृता फडणवीस

केंद्र सरकारच्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या अभियानावर आधारित असलेल्या 'अबक' या सिनेमाचं टीझर लाँच नुकतंच पुण्यात करण्यात आलं.

Updated: Nov 26, 2017, 03:54 PM IST
कोपर्डीतील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी- अमृता फडणवीस title=

पुणे : केंद्र सरकारच्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या अभियानावर आधारित असलेल्या 'अबक' या सिनेमाचं टीझर लाँच नुकतंच पुण्यात करण्यात आलं.

अमृता फडणवीस यांच्या हस्ते हा टीझर लाँच करण्यात आला. ग्रॅव्हीटी एंटरटेनमेंटची निर्मिती असणारा हा सिनेमा मराठीसोबतच १४ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

अभिनेत्री तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी अशी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमातील एका गीताला अमृता फडणवीस यांनी देखील आवाज दिलाय.

या कार्यक्रमावेळी कोपर्डी घटनेतील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलयं.