कोल्हापूर : पंचनदीवरील शिवाजी पुलावरुन मिनी ट्रॅव्हल्स खाली पडून झालेल्या अपघातास काणीभूत कोण आहे, याची चर्चा सर्वत्र सुरु होती. मात्र, या अपघातामागील कारण उलगडले आहे. चालकाने दारु प्यायलाचा फोरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आलाय. त्यामुळे दारुमुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट होत आहे.
दोन दिवसांपूर्वी हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलीस करत होते. ही मिनी ट्रव्हल्स ९० अंशात कशी वळली, याचे प्रात्यक्षिक पोलिसांनी घेतले. वरीष्ठ पोलिस अधिकारी आणि आरटीओचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्याच कंपनीची व्हॅन वेगवेगळ्या वेगात वळवून पाहिली आणि निरीक्षण केले.
दरम्यान, कोल्हापूरला येण्यापूर्वी मिनी बसमधील एक व्यक्ती आणि चालक दोघेही पन्हाळाच्या परिसरात जेवण करण्यासाठी उतरले. त्यावेळी त्यांनी दारुसाठी दारु घेतल्याचे स्पष्ट झालेय. जेवण आणि दारु प्राशन केल्यानंतर ते कोल्हापूरच्या दिशेने निघाले. चालकासोबत कुटुंबातील एक सदस्य दारु पिण्यासाठी जात असेल तर दुसर काय होणार, ही माहिती आपघातील एका जखमी मुलीनेच दिली आहे.
दरम्यान, पोलिसांना जखमी झालेल्या मुलीने जेवणासाठी पन्हाळ्याजवळ मामा आणि बस चालक उतरले अस सांगितले. त्यामुळे नेमका अपघात कसा झाला, याचा उलगडा होत नव्हता. मात्र, फोरेन्सिक लॅब अहवालानंतर हा अपघात चालकाने दारु प्यायल्यामुळे झाल्याचे स्पष्ट जालेय.