मोठी बातमी! संभाजीराजे छत्रपती मागील पाच दिवसांपासून नॉट रिचेबल

Kolhapur news : राज्याच्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी सुरु असतानाच आता कोल्हापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. 

सायली पाटील | Updated: Feb 7, 2024, 09:44 AM IST
मोठी बातमी! संभाजीराजे छत्रपती मागील पाच दिवसांपासून नॉट रिचेबल title=
Kolhapur news sambhajiraje chhatrapati not reachable latest political update

Political News : राज्याच्या राजकारणात अनेक खलबतं सुरु असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. इथं (NCP) राष्ट्रवादी पक्षचिन्हं आणि पक्षाचं नाव या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे गेलेल्या असतानाच संघर्षाची एक नवी लढाई शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांचा गटच लढत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, तिथं राजकीय वर्तुळातील एक मोठं नाव असणारी व्यक्ती संपर्कात नसल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. हे मोठं नाव आहे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं. 

माजी खासदार संभाजीराजे (sambhajiraje chhatrapati ) गेल्या पाच दिवसापासून नॉट रिचेबल आहेत. कुटुंब आणि कार्यकर्त्यांनाही संभाजीराजेंचा पत्ता लागत नाहीये. दोन फेब्रुवारीच्या रात्री दुसऱ्या दिवशीचे कोल्हापुरातील सगळे दौरे रद्द करत संभाजीराजेंनी X च्या माध्यामातून पोस्ट करत माहिती दिली होती.  कोल्हापूर लोकसभा मदारसंघात शाहू छत्रपती की संभाजीराजे छत्रपती उमेदवारीवरून चर्चांना उधाण आलेलं असतानाच आणि उमेदवारीवरून चर्चा सुरू असतानाच संभाजीराजे नॉट रिचेबल झाले आहेत. 

दुसरीकडे संभाजीराजेंच्या वाढदिवसाची कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारीही सुरू आहे. तेव्हा आता संभाजीराजे वाढदिवसाच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहणार की नाही याकडे लक्ष लागलं आहे. 

हेसुद्धा वाचा : हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार; सिडकोकडून 'या' भागात 3322 घरं विक्रीसाठी उपलब्ध 

 

संभाजीराजे लढणार लोकसभेची निवडणूक? 

काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आणि या घोषणेला अनेक फाटेही फुटले. संभाजीराजेंनी येत्या काळात लोकसभा निवडणुकीच्या लढतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी आपण स्वराज्य पक्षातूनच ही निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट करत विविध पक्षांच्या नावे सुरु असणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. 

संभाजीराजे कोल्हापूरातून निवडणूक लढणार की नाशिकमधून याबाबतच्या चर्चाही झाल्या. पण, आपण कोल्हापूरातूनच निवडणूक लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. 'राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे #स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे', अशी सोशल मीडिया पोस्ट करत त्यांनी अनेक चर्चांना पूर्णविराम देण्याचं काम केलं होतं. महाविकास आघाडीमध्ये संभाजीराजेंच्या प्रवेशाचे संकेत असतानाच काही अटींमुळं हे समीकरण काही पूर्ण होऊ शकलं नव्हतं. आता नॉट रिचेबल असणारे संभाजीराजे नेमके कुठे आहेत आणि सर्वांसमोर आल्यानंतर ते नेमकं काय बोलणार? कोणता मोठा गौप्यस्फोट होणार? असेच प्रश्न उपस्थित होत आहेत.