कोल्हापूर महापालिकेत सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का

कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. स्थायी समिती सभापती निवडीत भाजप ताराराणी आघाडीचे उमेदवार अशिष ढवळे यांची निवड झाली तर राष्ट्रवादीच्या मेघा पाटील यांचा पराभव झाला. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 12, 2018, 05:38 PM IST
कोल्हापूर महापालिकेत सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का title=

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. स्थायी समिती सभापती निवडीत भाजप ताराराणी आघाडीचे उमेदवार अशिष ढवळे यांची निवड झाली तर राष्ट्रवादीच्या मेघा पाटील यांचा पराभव झाला. 

स्थायी समिती सभापती पदाची निवड

कोल्हापूर महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती पदाची निवड होती. या पदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका मेघा पाटील यांनी तर  भाजप-ताराराणी आघाडीकडून आशिष ढवळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. 

कुणाला किती मतं?

या निवडीत अनपेक्षितपणे भाजपा ताराराणी आघाडीचे उमेदवार अशिष ढवळेंना ९ मतं पडली. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवार मेघा पाटील यांना ७ मतं मिळाली. या निवडीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण हे दोन नगरसेवक फुटले. सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी हा मोठा दणका मानला जातोय.