अंबाबाईची पालखी मंदिर आवारातून पुन्हा गाभाऱ्यात

अंबे माता की जयच्या गजरात अंबाबाई देवी सुवर्ण पालखीतुन बाहेर पडली. 

Updated: Oct 11, 2018, 08:02 AM IST
अंबाबाईची पालखी मंदिर आवारातून पुन्हा गाभाऱ्यात  title=

कोल्हापूर : फुलांची उधळण, भालदार चोपदारांचा लवाजमा, अंबाबाईच्या मूर्तीवर भाविकांकडून केला जाणारा फुलांचा वर्षाव आणि त्याला पोलीस बॅन्ड पथकाची साथ अशा मंगलमय वातावरणात देवीचा पालखी सोहळा पार पडला. आकर्षक विद्युत रोषणाई आणि अंबे माता की जयच्या गजरात अंबाबाई देवी सुवर्ण पालखीतुन बाहेर पडली. त्यानंतर मोठ्या जयघोषात देवीची पालखी मंदिर आवारातून फिरुन पुन्हा गाभा-यात विराजमान झाली.

हजारो भक्तांची हजेरी

 नवरात्रोत्सव काळात देवीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक अंबाबाई मंदिरात येतात. पण अनेक भक्तांना गर्दी अभावी देवीचं दर्शन घेता येत नाही, पण नवरात्रोत्सवाच्या काळात सलग नऊ दिवस देवीचा पालखी सोहळा होत असल्यामुळं भक्तांना या वेळी देवीचं सहज दर्शन घेता येतं. त्यामुळंच पालखी सोहळ्याला हजारो भक्त हजेरी लावतात.