पतंगाच्या मांजानं गळा कापल्याने महिलेचा मृत्यू

सुवर्णा मुजुमदार असं त्यांचं नाव आहे. त्या पुण्यातील एका दैनिकाच्या कर्मचारी होत्या.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 11, 2018, 04:10 PM IST

पुणे : पुण्यात पतंगाच्या मांजानं गळा कापला गेलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. सुवर्णा मुजुमदार असं त्यांचं नाव आहे. त्या पुण्यातील एका दैनिकाच्या कर्मचारी होत्या. 

दुचाकीवरून शिवाजीनगरकडे जात होत्या

बुधवारी संध्याकाळी त्या आपल्या दुचाकीवरून शिवाजीनगरकडे जात होत्या. त्यावेळी पालिकेजवळील शिवाजी पुलावर पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याभोवती गुंडाळला गेला. त्यात त्यांचा गळा कापला गेला. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. 

चिनी मांजाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर

मात्र शस्त्रक्रियाही केल्यानंतर सुवर्णा मुजुमदार यांचे निधन झालं. या घटनेमुळं पतंगासाठी वापरण्यात येणाऱ्या चिनी मांजाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय. यासंदर्भात ठोस कारवाई होत नसल्यानं अशा घटना वारंवार घडत आहे.