नाशिक - घोटी मार्ग ठप्प, कसारा घाटातही वाहतूक कोंडी

शहरातही काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय

Updated: Sep 26, 2019, 08:01 AM IST
नाशिक - घोटी मार्ग ठप्प, कसारा घाटातही वाहतूक कोंडी title=

नाशिक : एकीकडे पुण्याला अतिवृष्टीनं घाबरवून सोडलंय तर दुसरीकडे नाशिकलाही पावसानं धुवून काढलंय. नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे नाशिक मुंबई महामार्गावर अनेक भागात पाणी साचलंय. त्यामुळे नाशिक - घोटी दरम्यानची वाहतूक विल्लोळी वाडीवरे गावाजवळ पूर्णतः बंद झालीय.

दरम्यान, कसारा घाटातही एकाच बाजूनं वाहतूक सुरू असल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीये. नाशिक त्र्यंबक रस्ताही पूर्णपणे पाण्यात गेलाय. शहरातही काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.

सलग दुसऱ्या दिवशी पावसाने सप्तश्रुंग गडाला झोडपून काढलंय. ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने  घाटात पाणीच पाणी झाले होते.. पाच तास  पाऊस सुरु होता. त्यामुळे घाटाच्या  रस्त्याने  मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. अवघ्या  तीन दिवसांवर   शारदीय नवरात्रोत्सव  येऊन ठेपला  असून  निसर्गाने  सप्तश्रुंग  गड  धुवून काढल्याची भावना नागरीक व्यक्त करीत आहेत.