हापूसप्रेमी, ग्राहकांनो सावधान!, हापूसच्या नावाखाली कानडी भामटेगिरी

हापूस (Hapus) म्हणून तुम्ही बाजारातून जो आंबा आणताय तो खरंच ओरिजनल हापूस आहे का? याची एकदा खात्री करा. कारण ....

Updated: Mar 17, 2021, 11:16 AM IST
हापूसप्रेमी, ग्राहकांनो सावधान!, हापूसच्या नावाखाली कानडी भामटेगिरी  title=

रत्नागिरी / नवी मुंबई : हापूस (Hapus) म्हणून तुम्ही बाजारातून जो आंबा आणताय तो खरंच ओरिजनल हापूस आहे का? याची एकदा खात्री करा. कारण रत्नागिरी (Ratnagiri) किंवा देवगड (Devgad)  हापूसच्या (Hapus) नावाखाली तुमच्या माथी कर्नाटकचा (Karnataka) आंबा (Mango) मारला जात आहे. दामदुप्पट पैसे मोजून खरेदी केलेला हापूस ड्युप्लिकेट तर नाही ना? पाहुयात यावरचा एक रिपोर्ट. हापूसच्या नावाखाली तुमची होत आहे फसवणूक. ओरिजनल हापूसच्या नावाखाली कानडी भामटेगिरी दिसून येत आहे.  

मुंबईच्या मार्केटमध्ये हापूसप्रेमींची सध्या फसवणूक सुरूय.. कोकणातून सुमारे 16 ते 17 हजार हापूसच्या पेट्या वाशी मार्केटमध्ये दाखल झाल्यात... पण त्याआधीच इथं रत्नागिरी किंवा देवगड हापूसच्या नावाखाली चक्क कर्नाटक आणि केरळमधल्या आंब्याची विक्री केली जातेय. कोकणातल्या हापूसचा भाव 800 ते 1 हजार रुपये डझन आहे. तर कर्नाटकच्या आंब्याचा भाव 150 ते 200 रुपये किलो आहे. केरळचा आंबा देखील 500 ते 600 रुपये डझनानं विकला जात आहे. त्यामुळं ग्राहकांची फसवणूक होत आहे.

 आंब्यामधला फरक कसा ओळखायचा?

या फसवणुकीचा फटका कोकणातल्या हापूस उत्पादकांनाही बसत आहे. कर्नाटक आणि केरळातला आंबा हापूसप्रमाणेच दिसायला असल्यानं ग्राहकांची फसगत होत आहे. पण कोकणातला हापूस हा चवीला कर्नाटक आंब्यापेक्षा उजवा असतो. हापूसचा देठ खोल असतो, कापल्यावर तो केशरी रंगाचा दिसतो. हापूसची साल पातळ असते. आणि त्याला वेगळा सुगंध असतो
  
त्यामुळं हापूस घेण्याच्या नादात कानडी भामटेगिरीला बळी पडू नका. ओरिजनल हापूस है, असं कुणी सांगत असलं तरी आधी नीट खात्री करून घ्या. नाही तर हापूसचा अवीट गोडवा तुम्हाला नीट चाखता येणार नाही.