दीड वर्षापासून तरुणीवर लैंगिक अत्याचार, कंटाळून जीवन संपवंल

कल्याणमध्ये एका तरुणीला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या इमारतीच्या गच्छीवरुन उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुणीच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट सापडली आहे. 

Updated: Jun 15, 2022, 03:23 PM IST
दीड वर्षापासून तरुणीवर लैंगिक अत्याचार, कंटाळून जीवन संपवंल   title=

आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : कल्याणमध्ये एका तरुणीला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या इमारतीच्या गच्छीवरुन उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुणीच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट सापडली आहे. 

काय लिहिलंय सुसाईड नोटमध्ये?

सुसाईड नोटच्या सहाय्याने कोळशेवाडी पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करत अटकही केली आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात एका मुलीचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. 

आरोपींमध्ये मोठ्या बिल्डरची मुलांचा समावेश - 

पीडितेच्या कुटुंबीयांनी आमच्या मुलीसोबत बलात्कार झालाय का?,तिला ढकललं की तिने आत्महत्या केली? याचा तपास पोलिसांनी करावा, तिला ब्लॅकमेल केलं जात होतं?, बलात्काराची कलम का लावली नाही?,कल्याण मधील एका मोठ्या बिल्डरची मुलं यात सहभागी आहेत, आरोपीवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, बिल्डरकडून आमच्यावर देखील दबाव आणला जात आहे ,आमच्या जीवाला धोका आहे आम्हाला देखील पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे .