कासच्या पठारावर होत आहे, प्राण्यांची शिकार

सातारा जिल्ह्यात निर्सगाचं अमाप वरदान लाभलेलं कासचं पुष्पपठार आहे. या पठारापासून काही अंतरावरच कासच्या जंगलामध्ये, प्राण्यांची शिकार होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

Updated: Sep 4, 2017, 12:53 PM IST
कासच्या पठारावर होत आहे, प्राण्यांची शिकार title=

सातारा : सातारा जिल्ह्यात निर्सगाचं अमाप वरदान लाभलेलं कासचं पुष्पपठार आहे. या पठारापासून काही अंतरावरच कासच्या जंगलामध्ये, प्राण्यांची शिकार होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

 इथल्या सुमारे एक किलोमीटर परिसरामध्ये शिकारीसाठी जाळ्या लावून ठेण्यात आल्याचं आढळून आलं आहे. विशेष म्हणजे शिकारीचे प्रकार ज्या ठिकाणी घडत आहेत, तिथून वन विभागाचे चेक नाके अवघ्या हाकेच्या अंतरावर आहेत.

 महत्त्वाचं म्हणजे जंगलात जिथे कुंपण लावून प्राण्यांना पकडणारे सापळे लावलेत, ते ठिकाणच रस्त्यापासून फक्त १०० मीटर अंतरावर आहे.  

या सर्व प्रकारामुळे वन विभागाच्या कारभारावरच संशय व्यक्त केला जात आहे. वन्यप्राणीप्रेमींनी हा प्रकार वन विभागाच्या निर्दशनाला आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र वन विभागानं त्यांच्या तक्रारींकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.