जळगावांत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी वादळी पावसाने मोठे नुकसान झालं आहे.

Updated: Mar 21, 2018, 11:39 AM IST
जळगावांत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान  title=

जळगाव : शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी वादळी पावसाने मोठे नुकसान झालं आहे.

या पावसात काढणीला आलेला मका, गहू, हरभरा आणि कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे दीडशे हेक्टरवरील पिकांना वादळाचा आणि पावसाचा तडाखा बसलाय. तसेच चोपडा आणि रावेर तालुक्यात केळी आणि पपई च्या बागांनाही या पावसाचा फटका बसलाय. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या तीन ते चार वर्षांपासून सतत अवकाळी पावसाचा फटका बसतोय. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला जात असल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होतेय. जिल्ह्यातील रावेर, चोपडा, भुसावळ, भडगाव, जामनेर आणि यावल तालुक्याला अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झालेय. जिल्ह्यातील दीडशे हेक्टर वरील पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेय. 

कापणीस आलेला गहू आणि हरभऱ्यास पावसाचा फटका बसला. विजेच्या गडगडाटासह सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली.