तुकाराम मुंढेंचा सत्ताधारी भाजपला दणका, पालिका बजेट केले रद्द

महापालिकेत महासभेवेळी सत्ताधारी विरुद्ध प्रशासन असा सामना रंगला. पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याबाबतीत जयजयकाराच्या घोषणा देत विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला चांगलंच कोंडीत आणलं. दरम्यान, मुंढे यांनी सत्ताधाऱ्यांचे बजेट रद्द करुन नवीन बजेट सादर केले.

Surendra Gangan Updated: Mar 20, 2018, 11:15 PM IST
तुकाराम मुंढेंचा सत्ताधारी भाजपला दणका, पालिका बजेट केले रद्द title=

नाशिक : महापालिकेत महासभेवेळी सत्ताधारी विरुद्ध प्रशासन असा सामना रंगला. पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याबाबतीत जयजयकाराच्या घोषणा देत विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला चांगलंच कोंडीत आणलं. दरम्यान, मुंढे यांनी सत्ताधाऱ्यांचे बजेट रद्द करुन नवीन बजेट सादर केले.

अंदाजपत्रक म्हटलं की, पुढील वर्षभरात भ्रष्टाचार करण्याची तरतूद सुनियोजितपणे केली जाते. मुंढे यांनी नाशिक शहराला विकासाची दिशा देण्यासाठी सर्व भ्रष्ट योजनांना कात्री लावत नवीन बजेट सादर केलं. स्थायी सभापती समिती निवृत्त झाल्यानं त्यांनी थेट नियमानुसार स्थायी समितीवर बजेट पाठवलं. सत्ताधा-यांच्या अधिकाराला ते बोचल्यानं त्यांनी मुंडेंना आपली बाजू मांडू दिली नाही. आणि थेट पुन्हा स्थायीत चर्चेसाठी पाठवलं. 

मात्र, यावेळी सर्व विरोधकांची या विषयावर एकजूट झाल्यानं सत्ताधा-यांची चांगलीच कोंडी झाली. महासभेत सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात रोषाची बीजं रोवली गेली. आता पुढे हा रोष अधिक वाढणार असल्यानं सत्ताधा-यांचं बजेट मांडलं जाणार अशी चर्चा रंगू लागलीय.