१०८ वर्षाच्या आजीने मुलं, नातवंडासह केलीय कोरोनावर मात

गयाबाई चव्हाण असं या आजीचं नाव आहे. 

Updated: Aug 22, 2020, 04:44 PM IST

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : कोरोनाला घाबरु नका,असं आवाहन सगळेच अधिकारी करत असताना अनेक वृद्धांच्या मनात कोरोनाविषयी मनात भीतीचं वातावरण आहे. मात्र भीतीला चुटकीसरशी दूर करत जालन्यातील एका १०८ वर्षाच्या आजीसह याच आजीच्या ७८ वर्षाच्या मुलीने कोरोनाला धोबीपछाड देत कोरोनावर मात केलीय. 

जालन्यातील शहरातील या वयोवृध्द आजीने कोरोनावर मात केलीय. गयाबाई चव्हाण असं या आजीचं नाव आहे. कोरोनामुळे आजकाल सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. वयोवृध्द माणसं कोरोनामुळे मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीत १०८ वर्षाच्या गयाबाई चव्हाण या आजीने कोरोनाला धोबीपछाड देत कोरोनाला हरवलंय.

आजीचं वय जास्त असल्यानं आजी आता फार काळ आपल्यात राहणार नाही याची भीती कुटुंबातील सदस्यांना वाटत होती.पण या वयात एकही आजार नसल्यानं गयाबाई चव्हाण यांनी थेट कोरोनाशी दोन हात करत त्यावर मात केली.

आमच्या सून बाईंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आम्ही 5 जण पॉझिटिव्ह आलो होतो.आईला दवाखान्यात घेऊन गेलो तेव्हा तिला तिकडेच स्मशानभूमीत न्यावं लागेल की काय याची भीती होती पण ईलाज चांगले झाल्यानं आई बरी झाली याचा आनंद असल्याचे त्या म्हणाल्या.

या कुटुंबातील फक्त एकट्या आजीनेच कोरोनाला परतवून लावलं नाही.तर आजीसह घरातील ५ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते. आजीची मुलगी, मुलगा, नातसून सगळयांनाचं कोरोनाची लागण झाली होती.

यापैकी आजीची मुलगी असलेल्या ७८ वर्षाच्या शशिकला नांदरे यांनीही कोरोनावर मात केलीय. त्याही कोरोनामुक्त झाल्यायत.त्यामुळे घरात फक्त आनंदी आनंद आहे.

सगळेच आम्ही दवाखान्यात गेलो होतो तिथे आमच्यावर सगळ्या डॉक्टरांनी चांगले उपचार केले.आई मि भाचा भाऊ सगळेच दवाखान्यात गेलो होतो आता बरे होऊन आल्याने बर वाटत डॉक्टर ३ वेळा येऊन तपासणी करून जात होते.

आजीचे पती आसाराम चव्हाण हे स्वातंत्र्य सैनिक होते. सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत ते देशाच्या सीमेवर तैनात होते असं चव्हाण कुटुंब सांगतं.त्यामुळे चव्हाण कुटुंबात संकटांवर मात करण्याची ताकद ही पूर्वाश्रमीचीच पाहायला मिळते.कोरोनाच्या संकटावर देखील याच लढावू पध्दतीने लढल्याचं आजीच्या मुलांचं म्हणणंय.  माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सर्व घाबरले होते.पण डॉक्टरांनी मनोधैर्य वाढवलं.त्यामुळे आम्ही यावर मात केली आज मोठा आनंद होत 

आजीचं वय जास्त असल्यानं त्यांच्याकडे डॉक्टरांनी वेळोवेळी जाऊन तपासणी करत आस्थेवाईकपणे चौकशी केली.खास लक्ष देऊन ट्रीटमेंट केल्यानं आजी कोरोनामुक्त झाल्याचं डॉक्टरांचं म्हणनंय.आजीचं वय जास्त असूनही त्यांनी कोरोनाला हरवलं त्यामुळे या आजाराला घाबरून न जाता काळजी घ्या असं आवाहन डॉक्टरांनी केलंय.