नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करत आहे. कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची सीबीआयकडून चौकशी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता सीबीआय ची टीम करिनाच्या डीआरडीओ येथे दाखल झाली आहे. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सिद्धार्थ पिठाणी याची चौकशी डीआरडीओ कलिना येथे सुरु आहे.
दरम्यान सुरजीत सिंह राठोर यांनी झी न्यूजकडे मोठा खुलासा केलाय. सुशांतचा मृतदेह पाहण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती पोस्टमार्टम रुमपर्यंत गेली होती. ती तिथे 'सॉरी बाबू' म्हणत रात्रभर रडत होती. सुशांतच्या मृतदेहाजवळ ती ५ मिनिटं थांबली होती. रिया सुरजीत सिंह सोबत शवागरात सुशांतचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गेली होती.
१५ जूनला मी कपूर हॉस्पीटलमध्ये होतो. मी जेव्हा गेलो तेव्हा तिथे सुशांतचे मित्र किंवा परिवारातील कोणी व्यक्ती नव्हत्या. रिया चक्रवर्ती तिचा भाऊ, आई आणि एका व्यक्तीसोबत तिथे पोहोचले. कपूर हॉस्पीटलच्या मागच्या गेटजवळ ते थांबले. त्यानंतर रियाला घेऊन मी शवागरात गेलो. शवागरात गेल्यावर मी सुशांतच्या चेहऱ्यावरील चादर बाजुला केली आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी खूप भावूक झालो आणि रिया माझ्या शेजारी हात जोडून उभी होती असे सुरजीतने सांगितले.
सुशांतच्या गळ्यावरील फासाचे निशाण पाहता त्याने आत्महत्या केली असेल असे वाटत नसल्याचे तो म्हणाले. मी सुशांतच्या चेहऱ्यावरील चादर छातीपर्यंत खाली नेली. तेव्हा रियाने आपले दोन्ही हात ठेवून सॉरी बाबू असे म्हटले. ती सॉरी का बोलली ? याचा मी विचार करु लागलो.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या संशयास्पद मृत्यूनंतर सीबीआयची टीम दिशा सालियनच्या मृत्यूचीही चौकशी करणार असल्याचं समोर आलं आहे. दिशा सालियान ८ जूनला तिचा होणारा पती आणि काही मित्रांबरोबर मालाडच्या जनकल्याण नगरमधल्या एका बिल्डिंगमध्ये १४व्या मजल्यावर पार्टी करत होती. अचानक दिशा तिच्या खोलीत गेली आणि तिने दरवाजा बंद केला.
बराच वेळ दिशाने दरवाजा उघडला नाही, तेव्हा तिचा होणारा पती आणि मित्र दरवाजा तोडून आत घुसले. बाल्कनीमधून त्यांनी वाकून बघितलं, तर दिशा खाली पडल्याचं त्यांना दिसलं. यानंतर ते दिशाला बोरिवलीच्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, तिकडे दिशाला मृत घोषित करण्यात आलं.
या घटनेच्या एका आठवड्यानंतर १४ जूनला सुशांतसिंग राजपूत आपल्या घरात मृतावस्थेत सापडला. सुशांत आणि दिशाच्या मृत्यूमध्ये काही संबंध आहे का? हे सीबीआय तपासून पाहणार आहे. यासाठी सीबीआय दिशाच्या मृत्यूचीही चौकशी करणार आहे.