Weather update: राज्यात 1 मार्चपर्यंत 'या' जिल्ह्यात पडणार पाऊस; काही ठिकाणी गारपीटीची शक्यता

Maharashtra weather update : पुणे वेध शाळेने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा तसंच नागपूर शहराला पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. याशिवाय ढगांच्या गडगडाटांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Feb 29, 2024, 06:47 AM IST
Weather update: राज्यात 1 मार्चपर्यंत 'या' जिल्ह्यात पडणार पाऊस; काही ठिकाणी गारपीटीची शक्यता title=

Maharashtra weather update : राज्यातील वातावरणात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने बदल होतोय. या काळात नागरिकांना रात्रीच्या वेळेस काहीसा गारवा तर दुपारच्या वेळेस उन्हाच्या चटक्यांचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण देखील पहायला मिळतंय. गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे, गारपीट आणि पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालंय. अशातच मार्च महिन्याच्या १ आणि २ तारखेला अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा तसंच नागपूर शहराला पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. याशिवाय ढगांच्या गडगडाटांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे,  सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागात ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवलीये. 

मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता 

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 2 मार्चपर्यंत ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आजच्या दिवशी मराठवाड्यात गारपीटीची शक्यताही आहे. 

कोकणात 2 दिवस राहणार ढगाळ वातावरण

1 आणि 2 मार्च असे 2 दिवस ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवत असल्याचा अंदाज आहे. तर मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात 2 दिवस ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे. 

देशात कसं असेल वातावरण?

उत्तर भारतात हवामानात अचानक बदल झाल्याचं दिसून आलं आहे. आज हवामान आल्हाददायक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. अनेक ठिकाणी गाराही पडल्या. पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य महाराष्ट्रात एक-दोन भागात हलका पाऊस झाला.

स्कायमेट हवामान अहवालानुसार, 1 ते 3 मार्च दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1 मार्च रोजी जम्मू-काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तान, लडाख, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर 2 मार्च रोजी विविध भागात मुसळधार ते अतिवृष्टी होऊ शकते आहे.