पिंपरी : निधड्या छातीचा IPS आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे पिंपरी-चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कृष्णप्रकाश यांच्या आई मोठ्या गणेशभक्त होत्या मात्र गणेशोत्सव जवळ आला असताना त्यांच्या आईचं निधन झालं आहे.
आईच्या निधनाने कृष्ण प्रकाश यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आईच्या निधनाबाबत कृष्ण प्रकाश यांनी फेसबुक पोस्ट करत आईच्या निधनाची माहिती दिली. आई, तुझी गणपती बाप्पावर अपार श्रद्धा होती. तू कायम तुझ्याजवळ बाप्पाची मूर्ती ठेवायचीस. तुझ्या शेवटच्या दिवसातही तू बाप्पाला जवळ ठेवलंस. आता गणपती काही दिवसांवर आले आहेत. तू गेलीस, हे सगळं मला अपेक्षित नव्हतं. तुझ्याशिवाय मी काहीच नाही, असं कृष्ण प्रकाश यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
।। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी !!
कल संध्या 6.17 मिनट को हमने हमारी माँ खो दी और भिकारी हो गए!
“A mother is with us always, first in her lifetime, then forever in our memory.”
When we lose a loved one here on earth,we gain an angel in heaven that watches over us. pic.twitter.com/6c1LVrSbSJ— Krishna Prakash (@Krishnapips) August 20, 2022
कृष्ण प्रकाश यांच्या आईची गणपती बाप्पावर मोठी श्रद्धा होती. त्यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गणपती बाप्पाची मुर्ती आपल्या जवळ ठेवली होती. अवघ्या काही दिवसांवर गणपतीचं आगमन होणार असताना आईचं जाणं कृष्ण प्रकाश यांना मोठा धक्का देणारं होतं. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हणत आई गेली अन मी भिकारी झालो, त्यांचे हे शब्द खूप काही सांगून जाणारे होते.
दरम्यान, कृष्ण प्रकाश यांनी 2018 जगातील सर्वात खडतर ट्रायथलॉन स्पर्धा जिंकत अल्ट्रामॅन किताब जिंकणारे पहिले अधिकारी ठरले होते. तर 2017 ला त्यांनी आर्यनमॅन हा किताब पटकावला होता.