Pune News : 300 शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर, 'ब्लू बेल' शाळा अनधिकृत

Pune News : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी ब्ल्यू बेल्स शाळेचे मान्यतापत्र तपासले. 'झी 24 तास'ने यासंदर्भातली बातमी दाखवली होती. त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाला कारवाई करण्यासाठी जाग आली आहे. पुणे विभागातील 300 शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर आल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांची आता तपासणी होणार आहे.

Updated: Apr 20, 2023, 09:29 AM IST
Pune News : 300 शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर, 'ब्लू बेल' शाळा अनधिकृत   title=

Pune News : पुणे विभागातील 300 शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर आल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांची आता तपासणी होणार आहे. पुण्याच्या कोंढवा भागातील के. झेड नॉलेज सेंटर या इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याठिकाणी एनआयएनं कारवाई करुन दोन मजले सील केले होते. धक्कादायक म्हणजे त्याच इमारतीत 'ब्लू बेल' नावाची शाळा चालवली जाते. ही शाळा अनधिकृत असल्याचं उघड झालं होते. (Pune school building used as PFI terror training camps)

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी ब्ल्यू बेल्स शाळेचे मान्यतापत्र तपासले. 'झी 24 तास'ने यासंदर्भातली बातमी दाखवली होती. त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाला कारवाई करण्यासाठी जाग आलीय. त्यानुसार शाळांची तपासणी केली जाईल. आणखी काही शाळांकडील मान्यतापत्र बोगस असण्याची शक्यता आहे.

 दहशहतवादी कारवायांच्या तयारीसाठी वापरण्यात आलेल्या कोंढवा येथील इमारतीतील ब्ल्यू बेल्स ही शाळा अनधिकृत आढळून आली.  त्यानंतर  शिक्षण विभागाने पुणे विभागातील महाराष्ट्र बोर्डाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रामुख्याने शाळांच्या मान्यतांची पडताळणी करण्यात येणार आहे.

केंद्रीय तपास संस्थेने ब्ल्यू बेल्स शाळेचे दोन मजले सील केल्यानंतर शालेय शिक्षण विभागालाही कारवाई करण्यासाठीची जाग आली. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी ब्ल्यू बेल्स शाळेचे मान्यतापत्र तपासले. त्यानुसार पुण्यात 300 शाळा आता रडारवरआल्यात. पुण्यात महाराष्ट्र बोर्डाच्या 300 स्वयंअर्थसहाय्यित शाळा असून या सर्वच शाळांची तपासणी करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. आणखी काही शाळांकडील मान्यतापत्र बोगस असण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

गतवर्षी 22 सप्टेंबर रोजी शाळेच्या आवारातील दोन मजल्यांची झडती घेण्यात आली होती. यावेळी आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. या दस्तऐवजांवरुन असे उघड झाले आहे की आरोपींनी या मालमत्तेचा वापर पीएफआयशी संबंधित असल्याचे आढळून आल्याने, त्याच्या कार्यकर्त्यांसाठी शस्त्र प्रशिक्षण आयोजित केले होते. प्रशिक्षण शिबिरे आणि तरुणांचा सरकार, तसेच विशिष्ट समुदायाचे नेते आणि संघटना यांच्या विरोधात भडकवण्याचे केंद्र म्हणून काम करतात, असे दिसून आले आहे.