महागाईचे चटके! गोकुळ दूध महागलं, तब्बल 'इतक्या' रुपयांनी वाढ

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, नवे दर उद्यापासून लागू  

Updated: Apr 15, 2022, 08:42 PM IST
महागाईचे चटके! गोकुळ दूध महागलं, तब्बल 'इतक्या' रुपयांनी वाढ title=

Gokul Milk Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे. खाद्यतेल, भाजीपाला महागला असतानाच आता दूधाच्या दरातही वाढ झाली आहे. गोकुळच्या दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. 

गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर शेतकर्‍यांकडून करण्यात येणाऱ्या दूध खरेदी दरात गोकुळने दोन वेळा प्रति प्रतिलिटर दोन रुपयांची दरवाढ दिली होती. पण त्यावेळी दूध विक्री दरात वाढ करण्यात आली नव्हती. त्याचबरोबर रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दरही भरमसाठ वाढल्याने गोकुळच्या वाहतूक खर्चामध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

त्यामुळे आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर चार रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 54 रुपये प्रति लिटर असलेल्या गोकुळच्या दुधाचा दर आता 58 रुपये प्रति लिटर असा होणार आहे. शनिवार पासून ही दरवाढ सर्वत्र लागू होणार आहे.

गोकुळ दुधाच्या खरेदी विक्रीत वाढ झाल्यानं ग्राहकांना चांगलाच फटका बसणार आहे.