रोखून धरलेला श्वास सोडला, तब्बल 18 तासानंतर गवा पकडण्यात यश

सांगली येथील मार्केट कमिटीच्या आवारात आलेल्या गव्याला तब्बल 18 तासानंतर पकडण्यात यश आले आहे.  

Updated: Dec 29, 2021, 08:08 AM IST
रोखून धरलेला श्वास सोडला, तब्बल 18 तासानंतर गवा पकडण्यात यश  title=
संग्रहित छाया

सांगली : येथील मार्केट कमिटीच्या आवारात आलेल्या गव्याला तब्बल 18 तासानंतर पकडण्यात यश आले आहे. अत्याधुनिक व्हॅनच्या सहाय्याने गव्याला बाहेर काढण्यात आले. गव्याला सुस्थितीत पकडण्यात आले असून त्याला नैसर्गिक आदीवासात सोडले जाणार आहे. (Indian Bison Rescue in Sangli Market Yard)

 सांगलीच्या मार्केट यार्ड गवा

सांगलीच्या मार्केट यार्ड परिसरात गव्याचे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. रेस्क्यू ऑपरेश आधी पाच तास चालले. मात्र, गवा पकडण्यात यस येत नव्हते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते.

अत्याधुनिक व्हॅनच्या सहाय्याने गव्याला बाहेर काढण्याच काम सुरू होत. बोळात असलेल्या गव्हाचे दोन्ही बाजूने रस्ते गाडीच्या सहायाने बंद करण्यात आले होते. तिसऱ्या लहान बोळाच्या बाहेर मोठा खड्डा खणण्यात आला. व्हॅन त्या खड्यात उभी करण्यात आली. दोन्ही बाजूने गव्याला पुढे पुढे सरकवत तिसऱ्या लहान बोळातून व्हॅनमध्ये गव्याला आत घेतले गेले.

रेस्क्यू ऑपरेशन 

सांगली शहरात गवा घुसल्याचा माहिती मिळतातच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सांगली मार्केटयार्ड या ठिकाणी काल सकाळपासून हा गवा ठाण मांडून होता. मार्केटयार्ड येथील वेअर हाऊसच्या एका बोळामध्ये हा गवा होता. या गव्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून नियोजन करण्यात आले. रेस्क्यू टीमदेखील या ठिकाणी या दाखल झालेली होती. तसेच प्राणी मित्रही मदतीसाठी आले होते. या गव्याला बंदिस्त करण्यासाठी विशेष गाडी मागविण्यात आली होती.

वन विभागाकडून युद्धपातळीवर आता गवा जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर त्याला 18 तासानंतर यश आले. पकडण्यात आलेल्या गव्याला बंदिस्त करून निसर्गाच्या अधिवासात सोडण्यात येणार आहे.