आदिवासींसाठी जवानांचे अनोखे संवादपर्व

धड रस्ताही नसलेल्या या गावात जवानांनी आदिवासींसह दिवाळी साजरी केली

Updated: Oct 20, 2017, 09:57 PM IST
आदिवासींसाठी जवानांचे अनोखे संवादपर्व title=

आशिष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम भागात यंदा साजरी झालेली दिवाळी ग्रामस्थांना कायम स्मरणात राहील. धड रस्ताही नसलेल्या या गावात जवानांनी आदिवासींसह दिवाळी साजरी केली.

स्वातंत्र्यानंतर गावात आलेला पहिला दिवा, गावात पहिल्यांदाच आलेली एसटी, विकासाचा व ही माहित नसलेली गडचिरोली जिल्ह्यातली गावं. या गावांमधल्या जवानांना सतत नक्षलींशी दोन हात करावे लागतात अशा परिस्थितीत जवानांची दिवाळीही कुटुंबियांनाविनाच साजरी होते. मग याच गावातली मंडळी त्यांची कुटुंबिय होतात. याच माध्यमातून मग जवान आणि ग्रामस्थांमध्ये विश्वास निर्माण होतो.

यंदा जवान फराळ आणि दैनंदिन गरजेच्या वस्तु घेऊन थेट पोहचले चामोर्शी तालुक्यातल्या पावीलसनपेठ गावात. या गावात प्रशासन पहिल्यांदाच पोहचलं त्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

दिवाळी साजरी करण्याच्या निमित्तानं ग्रामस्थ आणि प्रशासनातली दरी दूर करण्यासाठी असं संवादपर्व अधिक लाभदायी ठरणारय.