VIDEO : माझ्या घरात कचरा फेकायचा नाही? ताडोबात नयनतारा वाघिणीने शिकवली पर्यटकांना अद्दल

आपल्या घरात कोणी कचरा केला आपल्याला आवडत नाही, मग आपण इतरांच्या घरात काय कचरा करतो? ताडोबामध्ये पुन्हा एका प्लास्टिक बाटलचा एक व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

नेहा चौधरी | Updated: Feb 15, 2024, 12:22 PM IST
VIDEO : माझ्या घरात कचरा फेकायचा नाही? ताडोबात नयनतारा वाघिणीने शिकवली पर्यटकांना अद्दल title=
In Tadobat Nayantara Tiger taught adalah to tourists Tiger Plastic water bottle video viral On social media

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : महाराष्ट्रातील चंद्रपूरमधील ताडोबा हे वाघ प्रकल्प वाघांचा दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. इथे लाखो पर्यटक वर्षभरात वाघाचे दर्शन घेण्यास येत असतात. जंगलातील वन्यप्राण्यांना प्लास्टिकसह अनेक वस्तूंचा त्रास होतो हे आपल्या माहिती आहे. तरीदेखील बेजबाबदार पर्यटक आजही सरार्स ते सोबत घेऊन जातात. एवढंच नाही तर तिथे ते जंगलात फेकतात. खरं सांगा तुम्हाला तुमच्या घरात कोणी कचरा केलाला आवडेल का? मग तुम्ही इतरांच्या घरात अगदी मुक्या प्राण्याच्या घरात कचरा कसा करु शकता. अशाच बेजबाबदार पर्यटकांला ताडोबातील नयनतारा वाघिणीने अद्दल घडवली आहे. 

नयनताराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कोणीतरी प्लास्टिकची पाण्याची बाटल जांभूळडोह सिमेंट बंधाऱ्यातील फेकून दिली होती. नयनतारा तिथे आली आणि तिने पाण्यातून ती बाटल काढली आणि तिथेतून ऐटीत निघून गेली. जणू काही तिने आपल्या घरातील घाण साफ केली. बाहेरच्या वस्तूंना जंगलात मनाई असतानाही ताडोबा व्यवस्थापनाचा व्याघ्रप्रकल्प स्वच्छ ठेवण्याचा संकल्पनाला या व्हिडीओने तडा गेला आहे. पुन्हा एकदा जंगलात प्लास्टिक बाटल दिसल्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. 

ताडोबा जंगलातील वाघिणी नयनतारा ही कुठला ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. निळ्या डोळ्यांची ही नयनतारा मोठ्या ऐटीत जांभूळडोह परिसरातील सिमेंट बंधारा परिसरात पाणी पिण्यासाठी आली होती. पण तिथे पाण्यात पडलेल्या प्लास्टिकचा बाटलवर तिची नजर गेली आणि ती पाणी न पिता निघून गेली. पण तिने तोंडात प्लास्टिकची बाटल घेतली. नयनताराचं हे कृत्य वन्यजीव अभ्यासक दीप काठीकर यांनी कॅमेऱ्यात कैद केलं. 

जंगलात प्लास्टिकची बाटल दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2020 जुनाबाई वाघिणीचे बछडे प्लास्टिक पिशवीशी, 2021 मध्ये अलीझंझा बफर क्षेत्रात वाघिणीचा बछडा प्लास्टिक बाटलशी आणि 2023 मध्ये नवेगाव-अलीझंझा बफर क्षेत्रात बबलीचे बछडे हे प्लास्टिकच्या बाटलशी खेळताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. प्लास्टिक हे वन्यप्राण्यासाठी हानीकारक असून आपल्या या चुकीने आपण प्राण्यांचा जीव धोक्यात घालतोय, याचं भानही पर्यटकांना नाही का?

नयनताराचं हे कृत्य प्रत्येक पर्यटकांसाठी एक धडा आहे. तुम्हीदेखील ताडोबा जंगल असो किंवा इतर कुठल्याही जंगलात भटकंतीासाठी जाणार असाल तर हा व्हिडीओ नक्की पाहा आणि काय करु नये हे लक्षात घ्या.