मुंबई : राज्यातील दिवसभराचा कोरोना पॉझिटिव्ह (Maharashtra Corona) रुग्णांचा आकडा समोर आला आहे. राज्यात आज (14 जुलै) कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा कोरोनाबाधितांचा आकडा हा जास्त आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये एकूण 8 हजार 602 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (in maharashtra today 14 july 2021 8 thousand 602 corona positive patients found)
कोरोना मुक्त होणाऱ्यांच्या संख्येत घट झालेली आहे. दिवसभरात एकूण 6 हजार 67 जणांनी यशस्वीरित्या कोरोनाला उपट दिली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 59 लाख 44 हजार 801 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा 96.17 इतका झाला आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
6,067 new cases have been reported in the state today
State tally of #COVID19 positive patients is now 61,81,247
District-wise details of cases and deaths until today are as follows:@airnews_mumbai@airnews_nagpur
(3/4) pic.twitter.com/HC5MJdci2Q
— PIB in Maharashtra (@PIBMumbai) July 14, 2021
दिवसातील मृत्यू
राज्यामध्ये आज 170 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर हा आता 2.04% इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,46,09,276 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,81,247 (13.86 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,80,771 व्यक्ती होम क्वारटाईन आहेत. तर 4,309 व्यक्ती संस्थातमक विलिगिकरणात आहेत. राज्यात एकूण 1,06,764 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईचा आकडा
मुंबईत 24 तासांमध्ये 635 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 582 जण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण 704259 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96 टक्के इतकं झालंय.
#CoronavirusUpdates
14th July, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/pxO4rSqQUO— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 14, 2021