ठाणेकरांसाठी थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी

ठाणेकरांसाठी थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी. ३१ डिसेंबरच्या ठाण्यातील उड्डाण पूल रात्री वाहतुकीसाठी बंद ठेवले जातील. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पोलीस जागोजागी नाकाबंदी करणार आहेत. 

Updated: Dec 30, 2020, 09:06 PM IST
ठाणेकरांसाठी थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी title=

ठाणे : ठाणेकरांसाठी थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी. ३१ डिसेंबरच्या ठाण्यातील उड्डाण पूल रात्री वाहतुकीसाठी बंद ठेवले जातील. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पोलीस जागोजागी नाकाबंदी करणार आहेत. 

नववर्षानिमित्त तरुणाई रात्री रस्त्यावर उतरते. तेव्हा मद्यपी वाहनचालक उड्डाणपुलाचा वापर करून पसार होतात. ते टाळण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री ११ नंतर ठाण्यातील पूर्व द्रुतगती मार्गावरील नितीन कंपनी तसंच घोडबंदरमधील काही उड्डाणपुलांवरील वाहतूक पोलिस बंद करणार आहेत. 

वाहनचालकांना खालच्या रस्त्यांचा वापर करावा लागेल. तसंच मद्यपी वाहनधारकाच्या मागे बसणाऱ्यांवरही कारवाई करणार असल्याची माहिती ठाणे वाहतूक विभागचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.