शिवसेना नाही तर भाजपने उमेदवारी द्यावी; विजय शिवतारे निवडणूक लढवण्यावर ठामच

आपण भाजपमध्ये जाऊन कमळ चिन्हावर लढू, असं शिवतारेंनी म्हटलंय. ही जागा शिवसेनेकडे घ्यावी, अशी मागणी केल्याचं त्यांनी सांगितलंय. बारामतीची निवडणूक पवार विरुद्ध पवार व्हायला नको, असं शिवतारेंचं म्हणणंय.

Updated: Mar 22, 2024, 03:48 PM IST
शिवसेना नाही तर भाजपने उमेदवारी द्यावी; विजय शिवतारे निवडणूक लढवण्यावर ठामच title=

Vijay Shivtare : लोकसभा निवडणुकीत राज्यातली सर्वात प्रतिष्ठेची लढाई ठरलीय ती बारामती लोकसभा मतदारसंघाची. नणंद आणि भावजय यांच्यामध्ये ही निवडणूक होणार आहे. मात्र दोन्ही पवारांना धुळ चारण्यासाठी महायुतीतल्या शिंदे गटाच्या विजय शिवतारेंनी दंड थोपटले आहेत. महायुतीमधल्याच मित्रांनी आव्हान दिल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीमध्येच कोंडी झाली. त्यामुळे बारामतीमधलं राजकीय वातावरण ढवळून निघाल आहे. अशातच  विजय शिवतारे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. शिवसेना नाही तर भाजपने उमेदवारी द्यावी अशी मागणीच विजय शिवतारे यांनी केली आहे. 

देशभरात पुढच्यालोकसभा निवडणूक होणार असून संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधातच शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे उभे राहिले आहेत. अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे.  शिवतारे सातत्याने अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. शिवसेना नव्हे तर भाजपने मला उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव शिवतारे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. दोन दिवसात हजारो लोकांचे मला फोन आले की कुठल्याही परिस्थितीत या धर्म युद्धात तुम्ही कमी पडू नका अस नागरिकांचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीत जर मी माघार घेतली तर नको ते लोक नको ती चर्चा करतील की मी सेटलमेंट केली विधानसभा साठी मी हे करत होतो. अस अपप्रचार हा चालूच होता असं यावेळी विजय शिवतारे म्हणाले.

विशेष म्हणजे जनसामान्यांच्या विश्वासाला जर मी अपात्र ठरलो आणि माघार घेतली तर लोकशाही मधील सर्वात मोठी हानी माझी आणि लोकांची होणार आहे. म्हणून मी माझ्या भूमिकेवर ठाम असून मी निवडणूक लढवणारच असल्याचं यावेळी शिवतारे यांनी सांगितल.

भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना शिवतारे यांनी प्रस्ताव दिला आहे. मीच प्रस्ताव दिला असून अपक्ष लढण्याऐवजी आमचं शिवसेना पक्ष हा खूप मोठं आहे. ताकदवान मुख्यमंत्री आहेत. बारामती लोकसभा मतदार संघात शिवसेना लढवून इतिहास घडवू शकते अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे. तसेच काल आढळराव शिवसेनेतून जाऊन राष्ट्रवादी कडून लढत आहे. तसं मलाही हरकत नाही की जर मला शिवसेना ऐवजी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर आणि तसा प्रस्ताव देखील मी फडणवीस यांना दिलं असल्याचं यावेळी शिवतारे म्हणाले.

दोन्ही पवारांना धुळ चारण्यासाठी शिवतारेंनी दंड थोपटलेत. दरम्यान, आम्हीसुद्धा अरे ला कारे करु शकतो, मात्र आम्हाला वातावरण खराब करायचं नाही अशा शब्दांत अजित पवारांनी विजय शिवतारेंना सुनावल आहे. विजय शिवतारेंची स्क्रिप्ट कुणाची असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केलाय. ते मुंबईत बोलत होते. तटकरेंचा रोख कुणाकडे आहे असा प्रश्न उपस्थित झालाय. शिवतारे आणि अजित पवारांमध्ये वैयक्तिक वाद नसल्याचंही त्यांनी म्हटल.