....तर पुन्हा निर्बंध कठोर करणार, नियम शिथिल करताना अजित पवारांचा पुणेकरांना इशारा

पालकमंत्री अजित पवारांनी (Guardian Minister Ajit Pawar) पुणेकरांना निर्बंध शिथिल (Pune Unlock) करताना इशाराही दिलाय.  

Updated: Aug 8, 2021, 05:32 PM IST
....तर पुन्हा निर्बंध कठोर करणार, नियम शिथिल करताना अजित पवारांचा पुणेकरांना इशारा title=

पुणे : पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Guardian Minister Ajit Pawar warns)  यांनी मोठी घोषणा केली.  पुण्यात उद्यापासून (9 ऑगस्ट 2021)  अनलॉक करण्याचा (PUNE UNLOCK) निर्णय अजित पवार यांनी घेतला. या निर्णयामुळे पुणेकरांसह व्यापारी, दुकानदार आणि हॉटेल चालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. हॉटेलचालक तसेच व्यापाऱ्यांना वेळ वाढवून दिली आहे. दरम्यान पवारांनी निर्बंध शिथिल करताना पुणेकरांना थेट इशाराही दिलाय. जर पुण्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ (Corona positivity Rate) झाली, तर पुन्हा एकदा कठोर निर्बंध लावण्यात येतील, असा इशाराच पवारांनी दिलाय. (If corona positive rate in Pune and Pimpri Chinchwad goes up to percent restrictions will be imposed again Guardian Minister Ajit Pawar warns) 

अजित पवार काय म्हणाले? 

सूट देताना अजित पवार यांनी कोरोनाचे नियम पालण्याचे आवाहनही केलंय. सोबतच निर्बंध शिथिल करताना त्यांनी पुणेकरांना इशाराही दिलाय. "पुण्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट हा 7 टक्क्यांच्या पुढे गेल्यास, पुन्हा निर्बंध लावण्यात येतील", असा थेट इशारा दादांनी दिलाय. याआधीही कोरोना नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिकांना कोरोना नियमांचा विसर पडतो. सोशल डिस्टंस पाळला जात नाही. त्यामुळे अजित पवारांनी खबरदारी म्हणून आधीच पुणेकरांना इशारा दिलाय.

पुण्यात उद्यापासून निर्बंधातून शिथिलता....

- सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार. 
-हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार. 
-शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी. 
-मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार आहे. मॉलमध्ये फक्त लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार आहे.  
- पुणे ग्रामीण सुद्धा लेवल तीन वर.