How To Clean Water Tank: प्रत्येकाच्या घरात किंवा बिल्डिंगवर एखादी पाण्याची टाकी असते. आपल्याला दररोजचा पाणी पुरवठा यातूनच होत असतो. तरीही वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहणारी ही वस्तू ठरते. अनेक ठिकाणी पाण्याची टाकी कित्येक दिवस स्वच्छ केली जात नाही. अशावेळी त्यात कचरा जमा होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे टाकीत घाणेरडे पाणी जमा होत राहते.
तुम्ही आंघोळ करत असाल, भांडी घासत असाल किंवा कपडे धूत असाल तेव्हा नळामधून घाणेरडे पाणी आल्याचा प्रकार तुमच्यासोबत घडला असेल. तुम्ही जर या घाणेरड्या पाण्याने आंघोळ केलात तर अनेक प्रकारचे गंभीर आजार तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे पाण्याची टाकी नियमित स्वच्छ करत राहणे गरजेचे आहे.
असे असले तरीही अनेकांना टाकीचे गांभीर्य कळत नाही. किंवा टाकी कशी स्वच्छ करायची याबद्दल फारशी माहिती नसते. तुम्हीपण यातलेच एखादे असाल तर काही महत्वाच्या टीप्स आम्ही सांगणार आहोत. या टीप्सच्या मदतीने तुम्ही घरची किंवा सोसायटीतील टाकी सोप्या पद्धतीने स्वच्छ करु शकता. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
तुरटी ही खूप गोष्ट आहे. तुम्ही तुरटीच्या मदतीने टाकीत जमा झालेला कचरा सोप्या पद्धतीने स्वच्छ करु शकता.टाकी खूप दिवस स्वच्छ केली नसेल तर तिच्या आत माती जमा होते. तुम्ही तुरटीच्या सहाय्याने मातीचा लेप घालवू शकता. यासाठी तुरटी पाण्यात चांगल्या पद्धतीने मिक्स व्हायला हवी.
तुरटी पाण्यात फिरवत राहा. यातून पाण्यात खोल गोल तयार होईल. असे केल्यास टाकीच्या आत तयार झालेला मातीचा लेप आपोआप निघून जाईल. मातीचा लेप निघून गेल्यानंतर टाकीतील पाणी स्वच्छ दिसू लागेल. तसेच ते पिण्यायोग्यदेखील असेल.