विषय... सुट्टी मिळणे बाबत... पोलिसाचं सुट्टीसाठीचं असं कारण तुम्ही कधीच ऐकलं नसेल

कदाचित तुम्हीही ऑफिसला सुट्टी हवी म्हणून एखादं कधी एखादं मजेशीर कारणं दिलं असेल.

Updated: Jun 2, 2022, 01:51 PM IST
विषय... सुट्टी मिळणे बाबत... पोलिसाचं सुट्टीसाठीचं असं कारण तुम्ही कधीच ऐकलं नसेल title=

पुणे : ऑफिसच्या कामातून सुट्टी हवी असेल तर आतापर्यंत अनेक मजेशीर कारणं तुम्ही ऐकली असेल. कदाचित तुम्हीही ऑफिसला सुट्टी हवी म्हणून एखादं कधी एखादं मजेशीर कारणं दिलं असेल. पण या पोलिसाने दिलेल्या कारणापेक्षा भारी कारण नक्कीच तुम्ही ऐकलं नसेल.

कदाचित यापूर्वी तुम्ही पावसाळ्यात पाणी साचलंय, कुत्रा आजारी आहे, ट्रेन बंद आहे, अशी अनेक भन्नाट कारणं ऐकली असतील. पण आता एक नवं कारण समोर आलं आहे. पुण्यातील एका हवालदाराने सुट्टीचा अर्ज दिला आहे. आणि या अर्जात हे भन्नाट कारण दिलं आहे.

पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने सुट्टी मिळावी यासाठी वरिष्ठांना पत्र लिहिलंय आहे. आपल्या सहकाऱ्याला चिलापी आणि रव मासे घेऊन यायचं आहे, असं कारण देत एका पोलीस कर्मचाऱ्याने वरिष्ठांना सुट्टी मिळण्याबाबत पत्र लिहिलं आहे.

मासे आणायचे कारण देत २ दिवस सुट्ट्या द्या असंही या पत्रात नमूद केलं आहे. हा सर्व प्रकार पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात घडला आहे. या पत्राची आता सर्वत्र चर्चा सुरू झालीये. सोशल मीडियावरही हे पत्र व्हायरल होतंय. 

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, या पत्रासंदर्भात पोलिसांना विचारलं असता त्यांच्याकडे असं पत्र अजून आलेलं नाही. मात्र हे पत्र सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होतंय.