हिंगोली : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला. हिंगोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी पिवळे झेंडे दाखवत गोंधळ घातला. यावेळी धनगर आरक्षणाची मागणी करत सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.
या गोंधळामुळे पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा मुद्दा तापल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर आरक्षणाचा मुद्दाही आपण निकाली लावू अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. हिंगोलीतील रामलीला मैदानावर बचत गट आणि शेतकऱ्यांना संबोधित करताना हा सगळा प्रकार घडला.