रेकॉर्ड ब्रेक पाऊस ! या जिल्ह्यात मुसळधार, अनेक गावांचा संपर्क तुटला

कोकणातील रायगड ( Raigad) जिल्‍हयातील मुरूड आणि रोहा या दोन तालुक्‍यात जोरदार पाऊस कोसळत आहे. (Record breaking rains in Roha-Murud)  

Updated: Jul 12, 2021, 11:20 AM IST
रेकॉर्ड ब्रेक पाऊस ! या जिल्ह्यात मुसळधार, अनेक गावांचा संपर्क तुटला title=

प्रफुल्ल पवार / अलिबाग : कोकणातील रायगड ( Raigad) जिल्‍हयातील मुरूड आणि रोहा या दोन तालुक्‍यात जोरदार पाऊस कोसळत आहे. (Record breaking rains in Roha-Murud) तसेच रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. (Heavy rains in Raigad) अलिबागहून मुरुडकडे जाणाऱ्या मार्गावर बोर्ली इथे रस्त्यावर पाणी आल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुरुड तालुक्यात यंदाचा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासात 348 मिलिमीटर पावसाची नोंद कऱण्यात आल्याची माहिती येथील तहसील कार्यालयाने दिली आहे.

मुरूड आणि रोहा तालुक्‍यात जोरदार पाऊस झाल्याने येथील रस्‍ते पाण्‍याखाली गेले आहेत. नदीच्‍या पाणीपातळीत वाढ झाल्याचे याचा  फटका नागरिकांना बसला आहे. काही घरे, दुकानात पाणी शिरले  आहे. मुरूड तालुक्‍याला काल रात्रीपासून पावसाने अक्षरशा झोडपून काढले आहे. सकाळी थोडी विश्रांती घेतल्‍यानंतर पुन्‍हा पावसाने जोरदार बरसायला सुरूवात केली आहे.  या पावसाने मुरूडचे जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. 

मुरूड बाजारपेठेतील अनेक रस्‍त्‍यांवर पाणी साचले असून अनेक घरे आणि दुकानांमध्‍येदेखील पाणी शिरले आहे. यामुळे व्यापारी धास्तावले आहेत. मुरूड ते आगरदांडा रस्‍तादेखील पाण्‍याखाली गेला आहे. रोहा तालुक्‍यातदेखील पावसाची संततधार सुरूच आहे. त्‍यामुळे कुंडलिका नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. जिल्‍हयाच्‍या अन्‍य भागात अधूनमधून पावसाच्‍या सरी कोसळत आहेत . तर काही ठिकाणी तुरळक पाऊस आहे . हवामान खात्‍याने रायगड जिल्‍हयात ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवली आहे.

अलिबागमध्ये काल रात्री मोठी दुर्घटना 

अखेर भिती खरी ठरली, दुरुस्ती अभावी अलिबाग-मुरूड मार्गावरील पूल कोसळला

दरम्यान, मुसळधार पावासने लहान पूलमध्येच खचला. त्यामुळे अलिबागमध्ये काल रात्री मोठी दुर्घटना घडली आहे. अलिबाग-मुरूड मार्गावर काशीद येथील नाल्यावरील पूल कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. दुर्घटनेत एक कार आणि बाईक अडकली होती. दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु केलं गेलं आहे. ( bridge at Kashid on Alibag Murud Road collapsed) ज्यावेळी कार आणि बाईक बाहेर काढली त्यावेळी आणखी एक आधीच बाईक कोसळ्याचे पुढे आले आहे. यातील बाईकस्वाराचा मृत्यू झाला.