सिंधुदुर्ग आणि महाड-पोलादपूर तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात 

Updated: May 14, 2021, 06:05 PM IST
सिंधुदुर्ग आणि महाड-पोलादपूर तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस title=

सिंधुदुर्ग : तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी पाऊस सुरु झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसामुळे दिलासा मिळाला आहे. विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. येत्या पाच दिवसांत जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

दुसरीकडे रायगड - महाड पोलादपूर तालुक्यातही जोरदार पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे तारांबळ उडाली. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम आता दिसू लागला आहे.

चक्रीवादळ बनण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उद्या सकाळी त्याचे चक्री वादळात रूपांतर होईल. सध्या हे वादळ लक्षद्विप बेटांजवळ आहे. १५ आणि १६ मेला ते गोवा, दक्षिण कोकण किनारपट्टीवर येईल. १८ तारखेपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जावू नये, असा इशारा दिला आहे. यावेळी मुसळधार पावसाचा इशारा ही कुलाबा वेधशाळेने दिला आहे.