नागपुरात विजांंच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

गेल्या काही दिवसांपासून ४२-४५ डिग्री तापमानामुळं हैराण झालेल्या नागपुरकरांना आज पहिल्या पावसानं थोडाफार दिलासा मिळाला आहे. 

Updated: May 26, 2018, 09:48 PM IST

 

 

 नागपुर : गेल्या काही दिवसांपासून ४२-४५ डिग्री तापमानामुळं हैराण झालेल्या नागपुरकरांना आज पहिल्या पावसानं थोडाफार दिलासा मिळाला आहे. संध्याकाळच्या वेळी अचानक आलेल्या पावसानं नागपुरकरांची त्रेधात्रिरपीट उडाली आहे. 
 
 नागपुरात अचानक आलेल्या पावसासोबतच विजांच्या कडकडाटही झाला आहे. कोसळणाऱ्या पावसानं वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण केला. या मान्सुनपूर्व सरींचा आनंद नागपुरकरांनी घेतला. पण उपराजधानीच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना अंधाराचा सामना देखील करावा लागला आहे. 
 
 अचानक आलेल्या या पावसामुळे सचिन तेंडुलकरचा नागपुरातील एक पूर्वनियोजित कार्यक्रमदेखील रद्द करावा लागला आहे.