कोल्हापुरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती; जलचर जीव पाण्याबाहेर

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती कायम आहे. बाजारभोगाव गावामध्ये कासारी नदिचं पाणी घुसलं.

Updated: Jul 14, 2018, 08:31 AM IST
कोल्हापुरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती; जलचर जीव पाण्याबाहेर title=

कोल्हापूर: जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालीय आणि यातच आता नदी मधले जलचर सुद्धा बाहेर येऊ लागले आहेत. अशीच एक महाकाय मगर शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी गावांमध्ये मानवी वस्तीत शिरली होती आजूबाजूच्या नागरिकांनी याची माहिती आपत्कालीन विभाग आणि वन विभागाला दिल्यानंतर तातडीने या ठिकाणी दाखल घेतली. आणि अकरा फुटी महाकाय मगरीला पकडण्यात यश मिळवलं त्यानंतर ही मगर इतरत्र सोडून देण्यात आली.

जिल्ह्यातील पूरस्थिती कायम 

दरम्यान,  कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती कायम आहे. बाजारभोगाव गावामध्ये कासारी नदिचं पाणी घुसलं. अधिच कासारी नदिच पाणी कोल्हापूर राजापूर रस्त्यावर आल आहे. यामध्ये आता कासारी नदिच पाणी बाजारभोगाव  येथे आल्यान हा मार्ग वाहतूकीसाठी ठप्प झालाय.

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

येत्या २४ तासांत मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम बंगालच्या वायव्येकडे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गुजरातच्या वर असलेली चक्रीय वातस्थिती आणि रायपूरजवळील चक्रीय वातस्थिती कायम आहे. त्यामुळे रविवारपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान आज दुपारी १ वाजता समुद्राला मोठी भरती आहे. ही भरती मोसमातील सर्वात मोठी भरती असेल.. त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचे आदेश दिलेत.