औरंगाबाद : शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढणार आहेत. तशी त्यांनी आतापासून तयारी केली आहे. शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला जोरदार टक्कर मानली जात आहे.
दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी नव्या पक्षाची घोषणा अलिकडेच घोषणा केली होती. नव्या पक्षाकडून जाधव हे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठी चुरस निर्माण होणार आहे. हर्षवर्धन जाधव कन्नडचे शिवसेना आमदार आहेत.
शिवसेनेसोबत आता संबंध नाही : आमदार हर्षवर्धन जाधव
मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव लवकरच नवा पक्ष काढणार आहे, त्यांनी औरंगाबादमध्ये त्याची घोषणा केली होती. सामाजिक समरसतेसाठी मराठा समाजासह 18 पगड जातींच्या प्रतिनिधींची त्यांनी बैठक घेतली आणि त्यानंतर सामाजिक समता निर्माण कऱण्यासाठी नवा पक्ष काढणार असल्याचं त्यांनी सांगितले. येत्या दीड महिन्यात हा नवा पक्ष स्थापन होणार आहे. मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका यावेळी जाधव यांनी मांडली.