Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते हाजीर हो!!! शिक्षा की सुटका.. लवकरच निर्णय

मेरा आवाज हिंदुस्तान का आवाज..." सदावर्तेच्या कोर्टात जाण्यापूर्वी घोषणा. रात्र पोलीस कोठडीत घालविल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांना आज जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.

Updated: Apr 15, 2022, 12:40 PM IST
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते हाजीर हो!!! शिक्षा की सुटका.. लवकरच निर्णय title=

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( sharad pawar ) यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' ( silver oak ) निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते ( gunratna sadavarte ) यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. गिरगाव कोर्टाने त्यांना याप्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

न्यायालयीन कोठडीचा कालावधी पूर्ण होताच गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांनी ( satara police ) मागितला. भाजप खासदार उदयनराजे भोसले ( Udyanraje bhosale ) आणि खासदार संभाजी छत्रपती ( chatrapati sambhaji ) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी हा ताबा मागितला होता.

गिरगाव कोर्टाने सातारा पोलिसांना परवानगी दिली त्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबईच्या कारागृहातून  साताऱ्यात नेण्यात आलं. कालची रात्र पोलीस कोठडीत घालविल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांना आज जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावतीने महेश वासवानी ( adv. mahesh vasvani ) युक्तिवाद करणार आहेत. न्यायालयात युक्तिवादाला सुरवात झाली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यापैकी एक गुन्हा हा अजामीनपात्र आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहील आहे.

२०२० साली गुणरत्न सदावर्ते यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीय.

दरम्यान, पोलीस कोठडीतून सदावर्ते यांना कोर्टात नेत असताना त्यांनी 'मेरा आवाज हिंदुस्तान का आवाज...', जय हिंद अशा घोषणा कोर्टात केल्या.     

मराठा समन्वयकांनी ( Maratha kranti Morcha )  छत्रपती घराण्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. कोणी असे शब्द वापरतील तर त्यांच्या विरोधात मराठा समाज पेटून उठेल, असा इशारा दिला होता.

त्यामुळे सातारा पोलिसांनी न्यायालय परिसरात आणि शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मराठा समन्वयकांकडून कोणतीही अनुचित घटना घडू नये याची काळजी पोलीस घेत आहेत.