पुणे : जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे इथं घोड नदीत अडकलेल्या एका आजींना साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात स्थानिक नागरिक आणि पोलीसांना यश आलय.
सत्तर वय असलेल्या शशिकला डोके या घोड नदी पात्रात कपडे धुवायला गेल्या होत्या. मात्र धरणातून १२,५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीच्या प्रवाहात अचानक वाढ झाल्यानं आजी नदीच्या मध्यभागी असलेल्या खडकावर अडकल्या.
अखेर पन्नास ते साठ फूट आतमध्ये अडकलेल्या आजींना पोलीस आणि नागरीकांनी मानवी साखळीद्वारे टायरच्या ट्यूबच्या सहाय्यानं नदीबाहेर काढलं. आजींचा जीव वाचावा यासाठी डिंभे धरणातील पाण्याच्या विसर्गाचा प्रवाहही कमी करण्याची सूचना पोलीसांनी दिलीये. या आजींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत.