Rohit Pawar : आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात

Cricket News :  आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात उतरले आहे. 

Updated: Jan 8, 2023, 04:08 PM IST
Rohit Pawar : आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात title=
grandfather Sharad Pawar Following Rohit Pawar also entered the cricket field and Maharashtra Cricket Association Chairman Rohit Pawar marathi news

Maharashtra Cricket Association Chairman : आताची सर्वात मोठी बातमी...राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) आजोबा शरद पवारांच्या (Sharad Pawar) पाठोपाठ क्रिकेटच्या (Cricket News) मैदानात उतरणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या पदावर रोहित पवार यांची निवड होणार अशी सूत्रांची माहिती आहे.  रोहित पवार क्लब गटातून विजयी झाले असून ते आता महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन सदस्य बनले आहेत. शिवाय 16 सदस्यीय कमिटीची सध्या पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर बैठक पार पडली असून या बैठकीत अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड झाली आहे. (grandfather Sharad Pawar Following Rohit Pawar also entered the cricket field and Maharashtra Cricket Association Chairman Rohit Pawar marathi news)

महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची बिनविरोध निवड झालीय. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड झालीय. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडलेल्या कमिटीच्या बैठकीत ही निवड करण्यात आलीय. आजोबा शरद पवारांनंतर आता रोहित पवारांचीही आता क्रिकेटच्या मैदानात दमदार एन्ट्री झालीय.