Political News : महाविकास आघाडीचं अखेर ठरलं, नाशिक आणि नागपुरात 'यांना' समर्थन

Political News : महाविकास आघाडीचं अखेर ठरलं आहे. नाशिक आणि नागपुरामधील उमेदवारांना समर्थन देण्याचे ठरले आहे. (Maharashtra Political News) त्यांना निवडून आणण्याची तयारी आघीडकडून करण्यात आली आहे. 

Updated: Jan 19, 2023, 03:40 PM IST
Political News : महाविकास आघाडीचं अखेर ठरलं, नाशिक आणि नागपुरात 'यांना' समर्थन title=
Maharashtra Graduate Elections Political News

Maharashtra Political : राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नाशिक आणि नागपूरच्या उमेदवारीवरुन एकमत झाले आहे. (Maharashtra Political News) नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांना पाठिंबा तर नागपुरात सुधाकर आडबाले यांना समर्थन देण्याचे निश्चित झाले आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर महाविकास आघाडीचं अखेर ठरले आणि अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला. (Maharashtra Politics) महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या निवडणूक होऊ घातल्या आहेत आहेत. (Maharashtra Political News in Marathi

महाविकास आघाडीकडून पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या पाच जागा आम्ही जिंकू असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या काळात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात झाली आहे. जुनी पेन्शन काँग्रेसने तीन राज्यात लागू केली आहे. भाजपच्या विरोधात राग जनतेमध्ये आहे. नाशिकमध्ये भाजपकडे उमेदवारच नाही. त्यामुळे ही जागा आम्हीच जिंकणार आहोत. तसेच या पाचही जागा मविआ जिंकेल, असा दावा त्यांनी केला आहे.

शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माझी विधान परिषद आणि पदवीधर निवडणुकीबाबत चर्चा झाली. त्यानुसार नाशिकमधील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यात येणार आहे. तशी चर्चा झाली आहे, असे नाना पटोले म्हणाले.

महाविकास आघाडीकडून पाच उमेदवार

नागपूर - सुधाकर अडबेले

अरावती - धीरज लिंगाडे

नाशिक - शुभांगी पाटील

औरंगाबाद - विक्रम काळे

कोकण - बाळाराम पाटील

 नाशिक पदवीधर मतदार संघाच्या ( Nashik Graduate Constituency Election ) निवडणुकीत आता चूरस निर्माण झाली आहे. काँग्रेसने उमेदवारी देऊनही डॉ. सुधीर तांबे  (Sudhir Tambe) यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. तर त्यांचा मुलगा सत्यजित तांबे (Satyajeet Tambe)  यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसने दोघांचेही पक्षातून निलंबन केले आहे. त्याचवेळी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने शुभांगी पाटील यांनी थेट मुंबई गाठत मातोश्री गाठली. ठाकरे गटाकडून त्यांना समर्थनही मिळाले आहे. आता महाविकास आघाडीनेही पाठिंबा देत त्यांनी निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोट निवडणूक

पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक होणार आहे. महाराष्ट्राची एक परंपरा होती पण ती परंपरा भाजपने मोडली आहे. भाजपकडून काय प्रस्ताव येतो त्यावर आम्ही विचार करु. प्रस्ताव आला नाही तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवू, अशी माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली. आमचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा झाली आहे. ते सध्या रुग्णालयात आहेत. त्यांना आम्ही नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी बोलावणार आहोत, असे पटोले म्हणाले.