जामीन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयात युक्तीवाद

गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी डॉ.विरेंद्र तावडे याच्या जामीन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयात युक्तीवाद झाला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 21, 2018, 01:17 AM IST
जामीन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयात युक्तीवाद title=

कोल्हापूर : गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी डॉ.विरेंद्र तावडे याच्या जामीन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयात युक्तीवाद झाला. न्यायमुर्तीनी दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकुन घेतल्यानंतर जामीनावरचा निकाल 30 जानेवारीला ठेवला आहे. 

डॉ. विरेंद्र तावडे हा गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख मास्टरमाईंड असुन त्याच्या विरुद्ध परिस्थीतीजन्य भक्कम पुरावे असल्यामुळं त्याला जामीन देवु नये असा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला.

तर तावडे दोषी असल्यासंदर्भात कोणताच सबळ असा पुरावा नाही, त्यामुळं त्याला जामीन मिळावा अशी मागणी तावडेच्या वकिलांनी कोर्टाकडं केली.